आमोणा अपघातात दुचाकीचालक ठार

0
141

आमोणा विर्डी मुख्य जंक्शनवर रविवारी रात्री झालेल्या स्वयंअपघातात गोकुळवाडी साखळी येथील अभय वसंत परांजपे (४४) यांचा मृत्यू झाला. डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम झाल्याने त्यांना साखळी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र इस्पितळातून गोमेकॉत नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. अभय परांजपे हे आपल्या स्पेंडर मोटरसायकलने रात्री १०.३० नंतर फोंड्याच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांनी कोणाला तरी लिफ्ट दिली होती. ते विर्डी पूल पार करून आमोणाच्या मुख्य जंक्शनवर पोहोचले असता समोरून आलेल्या एका गाडीमुळे गडबडून त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते रस्त्यावर फेकले गेले व हा अपघात झाला.