आमदार राजेश फळदेसाई पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष

0
13

गोवा पुनर्वसन महामंडळाच्या अध्यक्षपदी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बालभवनच्या अध्यक्षपदी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांपैकी चार आमदारांना आतापर्यंत महामंडळे देण्यात आली आहेत. त्यात गोवा साधन सुविधा मंडळाचे अध्यक्ष म्हणून केदार नाईक, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षपदी डिलायला लोबो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एकालाही अजूनपर्यंत मंत्रिपद देण्यात आलेले नाही. पहिल्या टप्प्यात आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्यासाठी हालचाली सुरू आहेत.