28 C
Panjim
Tuesday, September 22, 2020

आमदार मोन्सेरात यांच्यावर आरोप निश्‍चित

>> अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण; १७ ऑक्टोबरपासून सुनावणी

येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने पणजीचे भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार प्रकरणी काल आरोप निश्‍चित केले आहेत. तसेच, या प्रकरणातील सहआरोपी रोझी फेर्रांव हिच्याविरोधातही आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. आमदार मोन्सेरात आणि रोझी या दोघांना येत्या १७ ऑक्टोबरपासून या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीला सामोरे जावे लागणार आहे.

आमदार मोन्सेरात यांनी वर्ष २०१६ मध्ये आपल्या निवासस्थानी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमदार मोन्सेरात यांना अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. आमदार मोन्सेरात यांच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयात पिडीत मुलगी अल्पवयीन नसल्याचा दावा केला असून पिडीत मुलीच्या जन्म दाखल्याची प्रत मिळविण्यासाठी दोन अर्ज केले आहेत. या अर्जावर १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

सरकारी वकिलांनी पिडीत मुलीचा जन्म दाखला देण्यास विरोध दर्शविला आहे. पिडीत मुलीचा जन्म दाखला आणि मुलीवरील बलात्कार प्रकरण याचा काही संबंध नाही. जिल्हा न्यायालयाने बाल कायदा आणि आयपीसीखाली आमदार मोन्सेरात यांच्याविरोधात आरोपपत्र निश्‍चित करण्याचा आदेश दिलेला आहे, असा दावा सरकारी वकिलांनी केला.

संशयित आमदार मोन्सेरात आणि रोझी फेर्रांव या दोघांनी आरोपाचा इन्कार केला आहे. न्यायालयाने या बलात्कारप्रकरणी दर गुरूवारी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले आहे, अशी माहिती आमदार मोन्सेरात यांचे वकील ऍड. दामोदर धोंड यांनी दिली. बाबुश यांच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान, बाल कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली आरोप निश्‍चित केले आहेत, असेही ऍड. धोंड यांनी सांगितले.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ALSO IN THIS SECTION

मुसळधार पावसाने गोवा जलमय

>> आजही मुसळधार पावसाची शक्यता आजवर १५३.४८ इंच पाऊससरासरीच्या ३५ टक्के अधिकसांग्यात सात इंच पावसाची नोंदफोंडा, सत्तरी, केप्यालाही झोडपले

साडे बारा हजार रुग्ण होम आयसोलेशनखाली

राज्यात कोरोनाबाधितांकडून होम आयसोलेशन घेण्याचे प्रमाण वाढत असून सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ४८५ रुग्णांनी काल होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे होम आयसोलेशनखालील...

कृषी विधेयके ही २१ व्या शतकाची गरज : मोदी

सरकारने रविवारी संसदेत संमत केलेली तिन्ही कृषी विधेयके ही भारताची एकविसाव्या शतकाची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले. विरोधी...

निलंबित राज्यसभा सदस्यांचा सभागृहातून जाण्यास नकार

केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करताना असांसदीय वर्तणूक केल्याप्रकरणी राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांनी काल सभागृह सोडण्यास नकार दिल्याने...

केंद्र सरकारकडून रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने काल रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींत क्विंटलमागे ५० रू. ते ३०० रू. वाढ घोषित केली. लोकसभेत कृषीमंत्री...