आमदारांच्या भत्ते, पेन्शन वाढीबाबत अधिसूचना जारी

0
24

राज्य सरकारच्या कायदा खात्याने काल राज्यातील आमदारांचे भत्ते, पेन्शन वाढीबाबत अधिसूचना जारी केली.
गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांचे भत्ते, पेन्शन, कर्ज सुविधा वाढविणाऱ्या गोवा विधानसभा सदस्य वेतन भत्ते आणि पेन्शन कायद्यातील दुरुस्तीला मान्यता देण्यात आली आहे. आमदारांच्या वाहन कर्ज, गृह कर्ज, वैद्यकीय रक्कमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तसेच, आमदारांना आणखी 2 कर्मचारी नियुक्तीला मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच, इंधनामध्ये 300 लीटर वरून 500 लीटर एवढी वाढ करण्यात आली आहे.