आमचे सर्व उमेदवार सक्षम ः सगलानी

0
6

टुगेदर फॉर साखळीचे दहाही उमेदवार जाहीर

गेल्या दहा वर्षात साखळी पालिका क्षेत्रात टूगेदर फॉर साखळीतर्फे विकासाला मोठी चालना मिळाली आहे. समाजसेवा हा आमचा नारा असून जनतेचे प्रश्न निकालात काढण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आमचे सर्व उमेदवार अनुभवी व कार्यतत्पर आहेत. त्यामुळे आम्हांला निश्चित यश मिळेल असा विश्वास टूगेदर फॉर साखळीचे धर्मेश सगलानी आणि प्रवीण ब्लॅगन यांनी साखळीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आमच्यावर एकाच घरातील दोन दोन उमेदवार रिंगणात असल्याची टीका झाली. मात्र भाजप पक्षाकडे उमेदवार नसल्याने त्यांनी आमचे उमेदवार पळवलेले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये किती प्रमाणात फॅमिली राज आहे हे सर्वांना माहीत आहे अशी टीका सगलानी यांनी केली.
यावेळी टूगेदर फॉर साखळीचे दहाही उमेदवार जाहीर करण्यात आले.

बिनविरोध निवडून आलेले प्रवीण ब्लॅगन यांनी, आपण टूगेदर फॉर साखळी बरोबरच असून यापूर्वी व या पुढेही त्यांच्याबरोबरचं राहून सत्ता निश्चित स्थापन करू असा विश्वास व्यक्त केला. लोकांसाठी आम्ही काम केलेले आहे याची जाणीव जनतेला आहे. त्याच उद्देशाने आम्ही रिंगणात उतरलो असल्याचे यावेळी ब्लॅगन, सगलानी, सुनिता वेरेकऱ तसेच डॉ. सरोज देसाई आदींनी सांगितले. डॉ. देसाई यांनी, प्रभाग सहामधील 56 मतदारांची नावे अचानक गायब केली असून त्या विरोधात आम्ही न्यायलयात याचिका दाखल केली असल्याची माहिती दिली.

टूगेदर फॉर साखळीचे उमेदवार

प्रभाग एक ः कुंदा माडकर
प्रभाग दोन ः इशा सगलानी
प्रभाग तीन ः सुनिता वेरेकऱ
प्रभाग चार ः धर्मेश सगलानी
प्रभाग पाच ः बिनविरोध (प्रवीण ब्लॅगन)
प्रभाग सहा ः डॉ. सरोज देसाई
प्रभाग सात ः संपतराव प्रभुदेसाई
प्रभाग आठ ः बिनविरोध
प्रभाग नऊ ः भाग्यश्री ब्लॅगन
प्रभाग दहा ः राजेंद्र आमेशकर
प्रभाग अकरा ः रश्मी घाडी
प्रभाग बारा ः अश्विनी कामत