‘आप’ ने मद्य घोटाळ्याचा पैसा गोवा निवडणुकीत वापरला : ईडी

0
16

दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी नवा दावा केला. ‘आप’ने दिल्लीतील मद्य घोटाळ्याचा पैसा गोव्यातील निवडणूक प्रचारासाठी वापरला, असा आरोप ईडीने केला आहे. मद्य घोटाळ्याच्या आतापर्यंतच्या तपासात या निधीचा काही भाग ‘आप’च्या निवडणूक प्रचारातही वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. 2022 मध्ये गोवा विधानसभेची निवडणूक झाली, त्यात ‘आप’ ने दोन जागा जिंकल्या होत्या. ईडीच्या म्हणण्यानुसार, आपच्या सर्व्हे टीममध्ये सहभागी स्वयंसेवकांना सुमारे 70 लाख रुपये रोख दिले गेले.