29.1 C
Panjim
Wednesday, October 20, 2021

आपणासी जे जे ठावे … योगसाधना – ५२१ अंतरंग योग – १०६

 • डॉ. सीताकांत घाणेकर

शिक्षक हा सरस्वतीचा उपासक आहे. त्याच्या जीवनाचाच प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो. बालक वाणीपेक्षा वर्तनातून अधिक गोष्टी शिकत असतो. शिक्षकाने अंतर्बाह्य विशुद्ध राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपल्यापैकी अनेकांनी अनेक वेळा विविध ठिकाणी काही वाक्ये ऐकली असतील…

 • दुर्लभं मनुष्य जन्मः * दुर्लभं जन्म भारते.
  प्रत्येक सुज्ञ व्यक्तीला अर्थ नक्की समजतो. पण वरवरचा अर्थ माहीत असून जीवन विकास होत नाही. तर समजूत पक्की होऊन आपल्या आचरणातून तो स्वतःला व इतरांना दिसला पाहिजे.
  भारतीय संस्कृती विश्‍वाला मार्गदर्शक आहे, असे विश्‍वातील अनेक विद्वान परत परत सांगतात. पण भारतीयांना तरी याबद्दल किती माहिती आहे? आपल्यापैकी किती जण या थोर गूढ ज्ञानाचा अभ्यास करतात? त्यावर किती चिंतन करतात?
  ‘योगसाधना’ या विषयावर चिंतन करताना आमचा हेतू हाच आहे. संत ज्ञानेश्‍वर म्हणतात –
  ‘‘ आपणासी जे जे ठावे, ते ते इतरांसी शिकवावे|
  शहाणे करुनी सोडावे सकल जन|’’

थोडा विचार केला तर लक्षात येते की आपल्यासारख्या सामान्यांना… इतरांना योग्य रीतीने शिकवणे, त्यांना शहाणे करणे शक्य होईल का? कारण आपणच तर शिकत आहोत आणि कितपत शहाणे झालो… हा संशोधनाचा विषय आहे. हा अधिकार तर महान संत-महापुरुषांचा आहे. आपण जास्तीत जास्त हे ज्ञान इतरांकडे बोलू शकतो. त्याबद्दल लिहू शकतो. त्या ज्ञानाचा उपयोग किती व कसा स्वतःच्या उद्धारासाठी वा जगाच्या कल्याणासाठी करायचा जे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. आपण आपले कर्तव्य करुया.
या उच्च ज्ञानातील प्रत्येक विषय सुंदर, हृदयगम्य आहे. आता आपण ज्ञानदेवता माता श्रीसरस्वती हिच्याबद्दल विचार करूया.
सरस्वती मातेची आठवण निघाली की लगेच बालपणात शिकवलेला व अनेक ठिकाणी म्हटलेला… श्‍लोक आठवतो…
‘‘या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता
या वीणावर दण्डमंडित करा ह्या श्‍वेतपद्मासना
या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता
सा मांपातु सरस्वती भगवती निःशेषजाड्या पहा|’’

 • जी कुन्द कळीसारखी, चंद्र, तुषार व मुक्ताहारासारखी धवल आहे. जिने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. जिचे हात विणारुपी वर दंडाने शोभत आहेत. जी श्‍वेत पद्मासनावर विराजित आहे. जिला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासारखे मुख्य देव वंदन करतात. अशी जडतेला दूर करणारी भगवती सरस्वती माझे रक्षण करो!
  आपल्यापैकी अनेकांनी हा श्‍लोक म्हटला आहे आणि अनेकजण रोज देवपूजेच्या वेळी म्हणतात. पण कितीजणांनी त्याच्या शब्दार्थाकडे लक्ष दिले आहे? किती जणांनी त्याचा गर्भितार्थ, आध्यात्मिक तत्त्वज्ञान जाणून घेऊन अभ्यास करून त्यावर चिंतन केले आहे? आपण फक्त कर्मकांडात्मक हा श्‍लोक म्हणतो, पुटपुटतो. आज थोडे खोलात जाण्याचा प्रयत्न करुया. सागराच्या तळाला जाणार्‍यांना जसे मोती सापडतात, बहुमूल्य खजिना उपलब्ध होतो तसे आम्हालादेखील मिळेल.
  पू. पांडुरंगशास्त्री- योगेश्वर स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत- सरस्वतीपूजनाबद्दल सांगतात….
 • देवी सरस्वतीच्या स्वरूप वर्णनातच खर्‍या सारस्वतासाठी मार्गदर्शन सामावलेले आहे. सरस्वती कुन्द, इन्दू, तुषार व मुक्ताहार यांच्यासारखी धवल आहे. खरा सारस्वतही तसाच असला पाहिजे.
 • कुन्द- पुष्प सौरभ पसरविते. चंद्र शीतलता देतो. तुषार बिन्दू सृष्टीचे सौंदर्य वाढवतात आणि मुक्ताहार व्यवस्थेचे वैभव प्रकट करतो.
 • खर्‍या सारस्वताचे जीवन सौरभयुक्त असले पाहिजे. पुष्पाचा सुवास जसा सहज पसरतो तसा त्याच्या ज्ञानाचा सुवास वातावरणात चौफेर पसरलेला असतो.
 • चंद्र जसा समग्र विश्‍वाला शांती प्रदान करतो तसा सरस्वतीचा खरा उपासक अनेक लोकांच्या संतप्त जीवनात शीतलतेचा स्रोत वाहवितो. याच्या जीवनाच्या शीतल चांदण्यात अनेक दुःखी जिवाला शांती लाभते. त्याची शीतल छाया सर्वांना माया लावते.
 • वृक्षाच्या पानांवर पडलेले दवबिंदू मोत्यांची शोभा धारण करून वृक्षाच्या सौंदर्यात भर टाकतात, त्याप्रमाणे सरस्वतीच्या उपासकाच्या अस्तित्वाने संसारवृक्षाची शोभा वाढते. अशा मानवाला सांगावे लागते …
 • जयति तेऽधिकं जन्मना जगत्‌|
 • हार म्हणजे मुक्ताहार. एकट्या मोत्यापेक्षा मोत्यांचा हार अधिक सुंदर वाटतो. सरस्वतीच्या उपासकांनीही याप्रमाणे एकमेकांसह एका सूत्रात ओवून घेऊन काम करण्याची तयारी राखली पाहिजे. विद्वानांच्या शक्तीचा असा व्यवस्थित योग कोणत्याही महान कार्याला यश मिळवून देतो. एक एक विद्वान हा एक एक मोती आहे. पण ते सगळे भगवंताच्या सूत्रात ओवले गेले तर त्यांची शक्ती अनेक पटींनी वाढते.
 • मणि सर्व मिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव.
  एक एक शिकलेली व्यक्ती ही दीपकासमान आहे. हे सर्व दिवे एका हारात ओवले गेले तर दिवाळीच प्रकाश निर्माण होईल आणि हे दिवे अव्यवस्थित बनून अहंकाराने व्यर्थ झगडू लागले तर होळीची आग निर्माण होईल. दिवाळीचा प्रकाश प्रेरक असतो, तर होळीचा प्रकाश दाहक असतो.

आपण श्‍लोक म्हणतो तसेच या सर्व वस्तू – पुष्प, चंद्र, दवबिंदू, मोती… बघतो. पण महापुरुषच यांचा संबंध समजून त्यातील गूढ तत्त्वज्ञान सांगतात. असे ज्ञान मिळाले की श्‍लोक म्हणताना प्रत्येक शब्दाचा अर्थ समजतो व अनेक पटीने भावानंद, आत्मानंद मिळतो.

शास्त्रीजी पुढे काय समजावतात ते बघुया…

 • आई सरस्वतीने पांढरी वस्त्रे धारण केली आहेत. सरस्वतीचा उपासकही मन, वाणी व कर्म यांनी शुभ्र असला पाहिजे. येथे काही सांगण्याची परवानगी घेतो. शिक्षक हा सरस्वतीचा उपासक आहे. त्याच्या जीवनाचाच प्रभाव विद्यार्थ्यांवर पडतो. बालक वाणीपेक्षा वर्तनातून अधिक गोष्टी शिकत असतो. शिक्षकाने अंतर्बाह्य विशुद्ध राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कदाचित हे शक्य नसेल तर कमीत कमी त्याने बालकांसमोर शुभ्र रूपात हजर असले पाहिजे, असा आई शारदेचा तिच्या लाडक्या पुत्रांना संदेश आहे. जसे व्यसनांच्या आहारी जाऊ नये. त्याने सरस्वतीच्या मंदिराचे पावित्र्य सांभाळले पाहिजे. सरस्वतीची शुभ्र वस्त्रांनी आवृत्त राहण्याची ही गोष्ट केवढे व्यवहारी मार्गदर्शन करून जात आहे!
  खरेच किती सत्य आहेत हे शब्द! सारस्वत म्हणजे सरस्वतीचा वाहक – एक गुणवाचक शब्द. जातिवाचक नाही म्हणजे विद्वान व्यक्ती.
 • शिक्षक म्हणजे गुरू – जो संस्कार देतो, विद्यार्थ्यांचे जीवन प्रांगण त्यांना उभे राहण्यासाठी तयार करतो. प्रत्येक विद्वान व्यक्तीने, शिक्षकाने जर असे ज्ञान संपादन केले व त्यानुसार आचरण केले तर भारतीय संस्कृतीला व आपल्या भारतमातेला नक्की चांगले दिवस येतील.
  देवी सरस्वतीच्या हातात वीणा आहे. त्याबद्दल शास्त्रीजी म्हणतात …
 • सरस्वतीचा हात वीणेच्या वरदंडाने शोभतो. वीणा हे संगीताचे प्रतीक आहे व संगीत ही एक कला आहे. या दृष्टीने पाहता सरस्वतीचा उपासक, संगीतप्रेमी व जीवनाचा कलाकार असला पाहिजे. संगीत म्हणजे साम्यक् गीत. वीणेचे सूर जसे सुसंवादित असतात तशी आपली कार्येदेखील जर सुसंवादित असतील तर आपल्या जीवनात संगीत प्रकटेल. गीतेच्या ‘योगः कर्मसु कौशलम्‌|’ या संदेशाचाही येथे विचार करावासा वाटतो.
  शिवाय वीणेला वरदंड म्हणजे श्रेष्ठ दंड म्हटला आहे. दंड हा जर शिक्षेचे प्रतीक असेल तर याच्यापेक्षा श्रेष्ठ शिक्षा दुसरी कोणती होऊ शकते? ज्यांच्या शिक्षेतही संगीत आहे असा सारस्वत समोरच्या माणसाचे हृदयपरिवर्तन करू शकतो. माणसाला मारणार्‍या दंडापेक्षा माणसाला बदलवणारा दंड निश्‍चित मोठा आहे. याचे दर्शन सरस्वती माता वीणेचा दंड हातात धारण करून करविते.

आपले योगसाधक हे सारस्वतच आहेत. हे ज्ञान आल्यावर यापुढे जेव्हा जेव्हा सरस्वती कुठल्याही रूपाने – फोटो, मूर्ती, नाटक, सिनेमा- समोर येईल तेव्हा तेव्हा मातेच्या शुभ्र वस्त्राचा व वीणेचा अर्थ लक्षात आला तर मन आणखी प्रसन्न होईल.
योग्य ज्ञानाची हीच शक्ती आहे. आपली साधना जास्त प्रभावी होईल. ध्यान आणखी उत्तम होईल.
फोटो – सरस्वती – पुष्प, चंद्र, दवबिंदू, मोत्यांचा हार.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

प्रश्न खड्‌ड्यांचा

रस्त्यांना पडलेल्या खड्‌ड्यांवरून आणि नव्याने बांधकाम होत असलेल्या महामार्गांच्या दुर्दशेवरून विरोधकांनी काल राज्य विधानसभेत सरकारला घेरले. राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधी आम्हीही वेळोवेळी आवाज...

खराब महामार्गामुळे विधानसभेत गदारोळ

>> कंत्राटदाराला नोटीस पाठवल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती पत्रादेवी ते काणकोण या सहापदरी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावरून काल विधानसभेत विरोधकांनी गोंधळ...

भंडारी समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण नाही

>> पालयेकर यांचा विधानसभेत आरोप ओबीसीसाठी जे आरक्षण आहे त्या कोट्यातून भंडारी समाजाला जेवढे आरक्षण मिळायला हवे तेवढे ते...

नोकरभरतीसाठी कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्याची खंवटेंची मागणी

विविध सरकारी खात्यांत नव्याने नोकरभरती करण्यापूर्वी त्या त्या खात्यांत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना अगोदर सेवेत कायम केले जावे,...

भारतात कोरोनाचे ९९ कोटी लसीकरण

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती भारतात १६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेने काल तब्बल ९९ कोटींचा टप्पा गाठला...

ALSO IN THIS SECTION

स्तन कर्करोग जनजागृती

डॉ. मनाली पवार भारतात स्तनाचा कर्करोग सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. स्त्रियांमधील कर्करोगांपैकी स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २५ ते ३२...

अर्धशिशीवर होमिओपॅथी

डॉ. आरती दिनकर १६ वर्षांचा मुलगा यश. त्याला ‘मायग्रीन’ म्हणजेच अर्धशिशीचा त्रास होता म्हणून तो होमिओपॅथीच्या उपचारांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये...

महती भारतीय संस्कृतीची

योगसाधना - ५२४अंतरंग योग - १०९ डॉ. सीताकांत घाणेकर आज आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा, त्यावेळच्या...

‘दमा’वर होमिओपॅथीच हितकर

डॉ. आरती दिनकरहोमिओपॅथी तज्ज्ञ, समुपदेशकपणजी वारंवार होणारी सर्दी, शौचास साफ नसणे, अपचन, स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे विकार, मन:क्षोभ, हवेतील फेरफार,...

‘विद्या विनयेन शोभते’

योगसाधना - ५२३अंतरंग योग - १०८ डॉ. सीताकांत घाणेकर आपले पूर्वज किती थोर होते ज्यांनी...