आपच्या ५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

0
5

आम आदमी पक्षाने आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ५ उमेदवारांच्या नावाचा समावेश असलेली तिसरी यादी काल जाहीर केली. पणजी मतदारसंघात वाल्मिकी नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

फोंडा मतदारसंघातून ऍड. सुरेल तिळवे, मडकई मतदारसंघात गुरूदास येसू नाईक, पेडणे मतदारसंघातून पुंडलिक धारगळकर, शिवोली मतदारसंघातून विष्णू नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाने आत्तापर्यत तीन याद्यांतून २५ मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पहिल्या व दुसर्‍या यादीतून प्रत्येकी १० उमेदवारांची नावे तर, तिसर्‍या यादीतून ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आपने माजी मंत्री एलिना साल्ढाणा, माजी मंत्री महादेव नाईक, प्रतिमा कुतिन्हो, ऍड. अमित पालेकर, राहुल म्हांबरे, प्रा. रामराव वाघ आदींना उमेदवारी जाहीर केली आहे.