उत्तर प्रदेशामधील जगदिशपूर-अमेठी येथे निवडणूक प्रचारादरम्यान आम आदमी पक्षाचे (आप) नेते डॉ. कुमार विश्वास व त्यांच्या कार्यकर्त्यांवर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा दावा ‘आप’च्या माध्यम विभागाने केला आहे. जगदिशपूर भागात ‘आप’च्या नेते कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा पोचला असताना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवल्याचा आरोप करण्यात आला.
‘आप’चे कार्यकर्ते या हल्ल्यात जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे आपतर्फे सांगण्यात आले.दरम्यान ‘आप’च्या एका महिला कार्यकर्तीवर मुंबईत अज्ञाताकडून ब्लेडचा वार करण्यात आल्याचेही वृत्त आहे. पक्षाच्या प्रचारासाठी सदर कार्यकर्ती दिल्लीहून मुंबईत आली होती असे सांगण्यात आले.