आम आदमी पक्षाशी संबंध असलेले आणखी एक नेते विनोद कुमार बिन्नी यांनी काल दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या उपस्थितीत पक्षाची सदस्यता स्वीकारली. याआधी शाजिया जल्मी आणि किरण बेदी या आपच्या बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने केजरीवाल यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आप नेत्यांच्या भाजप प्रवेशावर कॉंग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लव्हली यांनी खिल्ली उडवली असून आता केजरीवाल कधी भाजपमध्ये प्रवेश करणार असे म्हटले आहे.

