आपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

0
12

आम आदमी पक्षाने (आप) आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. आपने यापूर्वी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 14 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. आपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी हणजूणमध्ये पूजन मालवणकर, कळंगुटमध्ये कॅरोल फर्नांडिस, पेन्हा डी फ्रँकामध्ये अरविंद तेंडुलकर, सेंट लॉरेन्समध्ये उज्ज्वला नाईक, केरीमध्ये अविनाश जाधव, वेलिंग प्रियोळमध्ये सरिता पणजीकर, कुडतरीमध्ये क्लेना फर्नांडिस आणि गिरदोली मतदारसंघासाठी जोसेफ पिक्सोटे यांना उमेदवारी दिली आहे.