आध्यात्मिक प्रगतीसाठी- ‘पातंजल योग’

0
12
  • डॉ. मनाली महेश पवार

आध्यात्मिक प्रगती जर साधायची असेल तर त्यासाठी पतंजली ऋषींनी सांगितलेला ‘पातंजल’ योग आचरणात आणण्याची गरज आहे. फक्त योगासनांनी नव्हे तर अभ्यास, वैराग्य व श्रद्धेने या आठही अंगांचे अनुष्ठान करावे लागेल.

‘योगा नव्हे, योग’ हे प्रत्येकाने प्रथम जाणून, आचरण करून, आपल्या मनावर ठासून, उमटवून, कोरून घ्यावे. पाश्चात्त्य लोक ‘योग’ या शब्दाचा ‘योगा’ म्हणून उच्चार करतात. त्यांचं प्रत्येकाने प्रत्येक बाबतीत अनुकरण करू नये. योग म्हणजे जीवा-शिवाचे मीलन. जीव-शिवाला जाऊन मिळणे म्हणजे योग. हे कसं साधायचं हे पतंजली ऋषींनी सांगितलं आहे. प्रत्येकाच्या शरीरातील आतील शक्ती म्हणजे आत्मा आणि बाहेर पसरलेली शक्ती म्हणजे ब्रह्म. या आतील आत्म्याने बाहेरील ब्रह्माशी भिडणे म्हणजे योग साधणे, असे पतंजली ऋषींनी म्हटले आहे. त्यांनी सांगितलेला हा योग म्हणजे ‘पातंजल योग.’ यालाच ‘राजयोग’ म्हणजे सर्व योगसाधनेचा राजा म्हटलेले आहे. त्याचप्रमाणे याला अष्टांगयोगदेखील म्हटले आहे. म्हणजे यात आठ विषय मांडले आहेत. आठ अंगे किंवा आठ प्रकार म्हणून अष्टांग.

योग म्हटले की सगळ्यांनाच योगासने वाटतात. पण मुळात पातंजल योग म्हणजे शारीरिक आसने नव्हेत. हा योग म्हणजे मन, बुद्धी, आत्मा आपल्या शरीराच्या आत साधण्याचा योग आहे. शारीरिक अंग-विक्षेपकांशी याचा संबंध नाही. योग हा वाचण्याचा ग्रंथ नाही; तो वापरण्याचा, आचरण करण्याचा ग्रंथ आहे. ‘योगः चित्तवृत्ति निरोधः।’ ही योगाची व्याख्या.

  • चित्त, वृत्ती व निरोध म्हणजे काय?
  • चित्त म्हणजे मन म्हणता येते.
  • वृत्ती म्हणजे मनाचा कल. एकदा हे करावेसे वाटते, एकदा ते करावेसे वाटते ह्या मनाच्या वृत्ती झाल्या.
  • निरोध म्हणजे अडवणे. मनाला वेगवेगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. त्यांना विरोध करणे, अडविणे म्हणजे योग.
    उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपली जी पाच ज्ञानेंद्रिये आहेत ती म्हणजे बाहेर उघडणाऱ्या खिडक्या आणि या खिडक्यांमधून मन सारखे बाहेर जात असते. या विषयांना जेव्हा अडवून मन स्थिर केले जाते तेव्हा ते आत्म्याशी संलग्न होऊ शकते, तेव्हाच योग साधता येतो. पातंजल योगाप्रमाणे बाहेर जाणाऱ्या विषयांना अडवून मन स्थिर करावे म्हणजे आपल्याला आत्मा जाणता येतो. मनाने आत्म्याला जाणणे म्हणजे योग.
    प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा व स्मृती या मनाच्या पाच वृत्ती आहेत. या सगळ्या वृत्तींमध्ये आपण गुरफटून जातो व मनाला शांती लाभत नाही. मन अस्थिर होते व जीवा-शिवाची भेट होत नाही म्हणजेच योग साधता येत नाही.
  • चित्तवृत्तींचा निरोध करण्यासाठी काय करावे?
    पातंजल शास्त्राप्रमाणे चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी अभ्यास व वैराग्य वापरायला पाहिजे.
  • अभ्यास म्हणजे नुसतं योगशास्त्र वाचणे नव्हे किंवा योगमंत्र पाठ करणे नव्हे. तसे आचरण करावे, अनुशासन करावे, ती कृती करावी. उदा. स्वयंपाक करण्यासाठी पाककलेची पुस्तके वाचून उपयोगाचे नाही, प्रत्येक पदार्थ बनवावाच लागतो. योगशास्त्रात अभ्यास म्हणजे चित्तवृत्तींना ताब्यात ठेवता आले पाहिजे. पण नित्य नियमाने सराव करावा लागतो. प्रत्येक मंत्र वाचायचा, विचार करायचा व त्याप्रमाणे वागायचे व त्याचा सराव करायचा म्हणजेच योगसाधना होते.
  • वैराग्य म्हणजे सगळ्या भावनांपासून विलग होणे, अलिप्त होणे. चांगल्या व वाईट दोन्ही भावनांचा त्याग करणे असे पतंजली ऋषींनी सांगितले आहे.
  • चित्तवृत्तीचा निरोध करण्याच्या स्थितीत सतत राहावे, याला अभ्यास म्हणतात. म्हणून रोजचा सराव करावा. हा सराव दीर्घकाळ असावा. इथे शॉर्ट कोर्स नाही. हे कायमचे. मरेपर्यंत सराव करावा. हा योग सतत, सातत्याने, निरंतर असावा. हे सगळे आदराने, मनापासून व जिद्दीने करावे.
  • वैराग्य कसे मिळवावे?
    पाहिलेले, श्रवण केलेले इत्यादी विषयांची तहान नाहीशी होणे म्हणजे वैराग्य. विषय व अनुविषयांची तृष्णा नाहीशी झाली म्हणजे वैराग्य लाभले असे म्हणावे. सर्व इंद्रिये व पंचकर्मेंद्रिये ही मनाच्या ताब्यात असणे म्हणजे ‘वशीकार’- वैराग्य होय.
  • मन व इंद्रिये ताब्यात ठेवून त्यांना बाहेरील विषयांपासून परावृत्त करून उलट अंतर्मुख बनवले तरच आत बसलेला आत्मा दिसतो, अन्यथा नाही.
  • गुणांची तृष्णासुद्धा नाहीशी होते त्यावेळी परमवैराग्य येते. निर्गुण आत्म्याचा एकदा साक्षात्कार झाला की खरे ज्ञान होते. हे सत्यज्ञान झाले की कुठल्याच गुण-दोषाबद्दल ओढ राहत नाही.
  • खरा परम विरक्त मनुष्य स्वर्गलोकाचीही अभिलाषा धरत नाही.
    अभ्यास व वैराग्याद्वारे योग साधता येतो, म्हणजेच योगांगांचे अनुष्ठान करावे असे पतंजलीनी सांगितले आहे. सात दिवसात पातंजल योगसूत्रे वाचणे म्हणजे अनुष्ठान का? पातंजल योगसूत्रे तोंडपाठ करणे, आवर्तने करणे म्हणजे अनुष्ठान का? अर्थातच नाही!
    एखाद्याच्या मागोमाग, जोडीने, चिकटून असणे म्हणजे अनुष्ठान. म्हणजेच योगाच्या अंगांप्रमाणे सातत्याने वागणे म्हणजे अनुष्ठान होय. सकाळी एक तास योग केला आणि मग तेवीस तास वाटेल तसे वागून पापे केली तर अनुष्ठान झाले नाही. वर्षाचे 365 दिवस सतत योगांगांना धरून वागणे म्हणजे अनुष्ठान होय. असे सातत्याने आचरणात ठेवले तर योग साधता येणार.
  • अष्टांगे कोणती?
    यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही आठ योगाची अंगे आहेत. या आठही अंगांचे अनुष्ठान केल्यास चित्तवृत्तिनिरोध साधता येतो. सतत, अखंडपणे ही आठ अंगे आत्मसात केली पाहिजेत.
  • यम ः अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे यम आहेत.
    1) अहिंसा ः कुणालाही शारीरिक अथवा मानसिक इजा न करणे म्हणजे अहिंसा होय. आपल्या बोलण्यानेसुद्धा कुणाला दुखवू नये असे अहिंसा सांगते.
    2) सत्य ः आपल्या आयुष्यात जे-जे घडले ते-ते मान्य करणे म्हणजे सत्याने वागणे. स्वार्थ सोडला तर सत्याचरण शक्य आहे. सत्याने वागणे व सत्य बोलणे. या यमाचे आचरण अखंडपणे, काही वर्षे सातत्याने केले तर वाचासिद्धी प्राप्त होते, आपण बोलू ते खरे ठरते.
    3) अस्तेय ः चोरी करणे म्हणजे जाणूनबुजून दुसऱ्याची वस्तू घेणे. त्याचबरोबर आपली नाही अशी बेवारस वस्तू आपण घेणे हेही पापच आहे.
    4) ब्रह्मचर्य ः ब्रह्माला धरून आचरण करणे.
    5) अपरिग्रह ः कोठूनही काही घेऊ नये व कसलाही संचय करू नये. सामान्य माणसांनी संसारोपयोगी वस्तू जरूर घ्यावात, पण त्या सन्मार्गानेच मिळवाव्यात व त्या जवळ ठेवल्या तरी त्यात मनाने गुंतून राहू नये.
  • नियम ः शुद्धी, संतोष, तप, स्वतःचा अभ्यास आणि ईश्वराजवळ सर्वस्व ठेवणे हे नियम आहेत.
  • शुद्धी ः शौच-शुची म्हणजे शुद्धता. आपण अंतर्बाह्य शुद्ध रहावे हा पहिला नियम आहे. आपले शरीर स्वच्छ ठेवावे, तद्वत शरीराभोवतीचा परिसरसुद्धा स्वच्छ ठेवावा. अंतःशुद्धी ही शरीराची, मनाची व बुद्धीची असावी. शरीरशुद्धीसाठी मिताहार, मन व बुद्धी शुद्ध होण्यासाठी सतत चांगले सात्त्विक वाचन, चिंतन, मनन करावे. नामजपानेही शुद्धी मिळते.
  • संतोष ः अंतर्बाह्य शुद्धता आली तर संतोष आपोआप निर्माण होतो. शुद्धता असेल तेथे प्रसन्नता असते. प्रसन्नता म्हणजे संतोष.
  • तप ः आपले तेज वाढविण्याचे सर्व प्रयत्न म्हणजे तप होय. शारीरिक तेज हे आरोग्यावर अवलंबून असते. देवाचा जप मनात करण्यातून मनाचे तेज वाढते. अनेकविध मार्गांनी अनेक प्रकारचे ज्ञान संपादन करण्याने बुद्धीचे तेज वाढते. शारीरिक, मानसिक व बौद्धिक तेज वाढले की आत्मिक तेज आपोआप वाढते.
  • स्वाध्याय ः स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करणे. स्वतःचा म्हणजे आपण ज्याला ‘मी’ म्हणतो त्या ‘मी’चा अभ्यास करणे. हा जो ‘मी’ आहे तो म्हणजे ‘आत्मा’ होय. स्वाध्यायाने या ‘मी’पर्यंत पोचता येते.
  • ईश्वर प्रणिधान ः आपले सर्वस्व ईश्वराच्या अधीन करणे. माझ्या प्रत्येक कृतीत मी माझ्यासाठी काही करीत नसून ईश्वरासाठी करीत आहे हे ज्ञान असेल तर ईश्वर सतत माझ्याजवळ राहतो. ईश्वरासाठीच प्रत्येक कृती असल्याने त्यात चूक घडणारच नाही. ईश्वरचरणीच अर्पिलेला देह ही ठाम भूमिका असल्यामुळे माझे ‘मी’पण शिल्लकच उरत नाही. अहंकार पूर्ण नाहीसा होतो, मन-बुद्धी ईश्वरात लय पावते. साहजिकच समाधी लागते.
  • आसन ः ज्या आसनात आपले शरीर अगदी स्थिर, निश्चल राहते व ज्यामध्ये आपणास सुख लाभते असे आसन असावे, असे साधे-सरळ विधान पतंजली ऋषींचे आहे. कठीण आसनांमुळे जर गुडघे इत्यादी दुखू लागले तर आपले मन गुडघ्यांमध्येच अडकून राहील. हे योगशास्त्र आत्मदर्शनासाठी आहे, मग आपण योग कसा साधणार? आपण सुखात बसलो तर शरीराकडे लक्ष जात नाही. म्हणून मऊ गादीवर साधी मांडी घालून बसावे.
  • प्राणायाम ः स्थिर सुखासनामध्ये बसून, प्रयत्नपूर्वक शैथिल्य आणून अनंताशी समापत्ती साधली आणि द्वंदाचा परिणाम संपला म्हणजे आपोआप श्वास-प्रश्वास थांबतात. श्वासोच्छ्वास आपोआप थांबण्याच्या या क्रियेला प्राणायाम म्हणतात. द्वंद संपले म्हणजे माझ्या आतील हवा व बाहेरील हवा हे द्वंदसुद्धा संपते.
  • प्रत्याहार ः आपल्या आत चित्त आहे. त्या चित्ताकडे पंचज्ञानेंद्रिये वळवून त्या चित्ताच्या स्वरूपासारखा आकार म्हणजेच प्रत्याहार. इंद्रियांवर ताबा मिळवून त्यांची बाहेरची धाव बंद करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रत्याहार होय.
  • धारणा ः मन एका ठिकाणी धरून ठेवणे. श्वास रोखला की मन धारणा करू शकते. मन हे चंचल असते, पण जर ते एका जागी रोधून ठेवले तर त्या स्थिरतेमुळे त्याची शक्ती टिकून राहते.
  • ध्यान ः ध्यान म्हणजे चिंतन करणे, विचार करणे. पण हे चिंतन किंवा विचार धारणेसंबंधीच पाहिजे तरच ध्यान म्हणता येते. ध्यान याचा अर्थ धारणेच्या विषयाचे एकतान होऊन चिंतन करणे. नुसते अर्धा तास एका जागी बसणे म्हणजे ध्यान नव्हे. ध्यानामध्ये एकाच विषयाचा विचार करण्याची सवय लागली की निर्णयशक्ती चांगली प्राप्त होते.
  • समाधी ः धारणा व त्याचे विषयांचे एकतान होणे म्हणजे ध्यान व ही तान (तार) कुठेही तुटता कामा नये. अशी तार लागली म्हणजे केव्हातरी आपण स्वतःला विसरतो व ध्यान-विषयही पूर्ण विसरतो. आपण आणि ध्यान-विषय वेगळे आहेत, हा भावच येथे उरत नाही, यालाच समाधी म्हणतात.
    आज आरोग्याची व्याख्या सांगताना ‘डब्ल्यूएचओ’ने शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक ‘वेल बिईंग’ म्हणजे आरोग्य असे म्हटले आहे. यामधील आध्यात्मिक प्रगती जर साधायची असेल तर त्यासाठी पतंजली ऋषींनी सांगितलेला ‘पातंजल’ योग आचरणात आणण्याची गरज आहे. फक्त योगासनांनी नव्हे तर अभ्यास, वैराग्य व श्रद्धेने या आठही अंगांचे अनुष्ठान करावे लागेल.