आधी कडाक्याची थंडी; नंतर पावसाळी वातावरण

0
27

मागील रविवार व सोमवार या दोन दिवसांत कडाक्याच्या थंडीने समस्त गोमंतकीयांना गारठवल्यानंतर काल राज्यातील हवामानात अचानक मोठा बदल दिसून आला. ऐन नोव्हेंबर महिन्यात राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दमट आणि ढगाळ वातावरण कायम होते. परिणामी दिवसभरात सूर्याचे दर्शन झाले नाही, तसेच थंडी देखील कमी झाल्याचे जाणवले.

दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडूजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील हवामानावर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील वातावरण ढगाळ बनले आहे. या बदललेल्या वातावरणाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.