आधार-पॅन कार्ड 31 मार्चपर्यंत लिंक करून घ्या ः मुख्यमंत्री

0
9

राज्यातील नागरिकांनी येत्या 31 मार्च 2023 पर्यत आधार कार्ड – पॅन कार्ड लिंक करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले.
केंद्र सरकारच्या वित्त विभागाने 31 मार्च 2022 पर्यंत आधार -पॅन कार्ड लिंक करण्याचा आदेश जारी केला होता. कोरोना महामारीमुळे केंद्र सरकाराने 1 हजार रुपयांचा दंड भरून आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यत वाढविली आहे. वित्त विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन आधार-पॅन कार्ड लिंक केले जाऊ शकते किंवा सीए, टॅक्स ऑडिटर, सिटीझन सर्व्हीस सेंटर येेथे केले जाऊ शकते. नागरिकांनी आधार-पॅन कार्ड लिंक करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.