पशुसंवर्धनमंत्री हळर्णकर यांची माहिती
न्यायालयाच्या आदेशानंतरच राज्यात भटक्या श्वानांसाठी निवारा गृहे (शेल्टर होम) उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी काल एका कार्यक्रमानंतर येथे दिली.
भटक्या श्वानांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम आदेश आल्यानंतर राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करणार आहे. भटक्या श्वानांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी आहे, असेही हळर्णकर यांनी सांगितले. राज्य सरकारने भटक्या श्वानांचे पुनर्वसन करण्यासाठी कृती योजना तयार करण्यासाठी आणि ती अमलात आणण्यासाठी 3 सदस्यीय कृती दल स्थापन केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

