आदिवासी भवनसाठी15 दिवसांत निविदा

0
18

राज्यातील अनुसूचित जमातींसाठीकरिता (एसटी) पर्वरी येथील प्रस्तावित आदिवासी भवन बांधणीचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी येत्या 15 दिवसांत निविदा काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती काल आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी दिली. या भवनासाठीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यासाठीच्या जमिनीसंबंधीची सगळी कागदपत्रे वैध आहेत. त्यामुळे तेथे हे भवन उभारणीसंबंधीच्या कामात कोणतीही कायदेशीर अथवा तांत्रिक अडचण येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील आदिवासी समाजासाठी हे भवन एक महत्त्वाचे असे केंद्र ठरणार असून या केंद्रात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच प्रशासकीय उपक्रम राबण्यासाठीची सोय असेल, असे तवडकर यांनी स्पष्ट केले.