24 C
Panjim
Thursday, November 26, 2020

आदित्य मैदानात

प्रबोधनकार ठाकरे यांचे पणतू, बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र असलेल्या आदित्य ठाकरे यांनी काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. आजवर कधीही निवडणुकीच्या रिंगणात न उतरणार्‍या, परंतु तरीही महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला प्रभाव ठेवणार्‍या ठाकरे घराण्यातील ही पहिलीच व्यक्ती आदित्य यांच्या रूपाने येत्या विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल आजमावणार आहे. त्यामुळे या घटनेला विशेष असा अर्थ आहे. भाजपच्या आक्रमक राजकारणामध्ये दूरस्थ रिमोट कंट्रोल कुचकामी आहे याची जाणीव झाल्यानेच ठाकरे कुटुंबातील हा वारसदार प्रत्यक्ष मैदानात उतरवला गेला असल्याचे सद्यपरिस्थितीत दिसते आहे. वरळीच्या सी लिंकखालून किती पाणी वाहून गेले आहे त्याचा प्रत्ययही या निमित्ताने मुंबईकरांना येतो आहे. आदित्य ठाकरेंनी काल उमेदवारी अर्ज भरायला जाताना शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन केले तेव्हा त्यांच्या ‘रोड शो’चा प्रारंभ दक्षिणात्यांमध्ये शुभकार्याप्रसंगी वाजवल्या जाणार्‍या नादस्वरम्‌ने झाला. एकेकाळी याच मुंबईमध्ये ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’चा नारा शिवसेनेने दिला होता आणि मुंबईतील नोकर्‍यांमध्ये वरचष्मा असलेल्या दक्षिण भारतीयांविरुद्ध लढण्यासाठी मराठी माणसाला उभे केले होते. आता काळ बदलला आहे आणि अर्थातच शिवसेनाही बदलत चालली आहे. तिची आक्रमकता तर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर लयाला गेलीच आहे. आता केवळ मराठी माणसाच्या अस्मितेची बात न करता मुंबईच्या कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा एक घटक बनून ही संघटना नव्या दिशेने पुढे चालल्याचे दिसते आहे. बाळासाहेबांनी मुंबईतील मराठी माणसाचा कैवार या एकमेव भूमिकेच्या पायावर ही लढाऊ संघटना उभी केली होती. अयोध्या आंदोलन उभे राहू लागल्यानंतर भाजपाचा वाढता उदय लक्षात घेऊन हळूहळू ती हिंदुत्वाच्या राजकारणात शिरली आणि भाजपापेक्षाही कडव्या रीतीने हिंदुत्वाचे समर्थन करू लागली. हिंदुत्वाचे राजकारण करता करता उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचली. भोजपुरी संमेलने वगैरे आयोजित करू लागली आणि आता तर मुंबईतील दक्षिण भारतीयांनाही ती पुकारू लागली आहे. आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघातून उभे राहिले आहेत, त्याची भौगोलिक रचना आणि एकूण मतदारांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शिवसेनेने ‘केम छो वरळी’ सारखे गुजरातीसह विविध भाषांतील फलकही झळकवल्याचे पाहून लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. शिवसेनेने आपली पारंपरिक भूमिका तूर्त तरी पार गुंडाळून ठेवली असावी असे चित्र आहे. शेवटी प्रश्न सेनेच्या प्रतिष्ठेचा आहे. आदित्य यांना वरळीमध्ये उतरवताना त्याची रीतसर पूर्वतयारी शिवसेनेने केली. भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या पा र्श्वभूमीवर ‘आदित्य संवाद’ उपक्रम आयोजित करून महाराष्ट्राला आधी त्यांचा जवळून परिचय घडवण्यात आला. ‘आरे’ सारख्या ज्वलंत विषयामध्ये आदित्य विरोधाची ठाम भूमिका घेऊन उतरले. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांची असलेली ओळख आता शिवसेना नेते म्हणून पुढे आलेली आहे. वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असतानाही तेथील स्थानिक नेते सुनील शिंदे यांच्याशी रीतसर चर्चा करून त्यांच्या पाठिंब्यानिशीच त्यांना निवडणुकीत उतरवले गेले आहे. ‘नवमहाराष्ट्र घडवण्याची हीच ती वेळ’ ही आदित्य यांच्या राजकारण प्रवेशाची एकंदर टॅगलाइन आहे. आदित्य यांचे सक्रिय राजकारणात येणे याचा अर्थ उद्या राज्यात सेना – भाजपची सत्ता आली आणि सेना पुरेशा जागा मिळवून सौदेबाजीच्या परिस्थितीत असली तर मुख्यमंत्रिपदासाठी आदित्य यांचे नाव अपरिहार्यपणे पुढे केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाही आदित्य यांच्या राजकीय प्रवेशाबाबत नाराजी जरी दर्शवीत जरी नसला, तरी फारसा उत्सुकही नाही. आदित्य उमेदवारी अर्ज भरायला जात असताना देवेंद्र फडणवीस स्वतः येणार असे सांगितले गेले होेते, परंतु भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा तेवढे त्यांच्यासोबत भाजपच्या वतीने हजर होते. बाकी सारा उद्धव, रश्मी, तेजस असा कौटुंबिक माहोल होता. आदित्य हा अतिशय उमदा चेहरा आहे. पित्याप्रमाणेच अतिशय विनम्र स्वभावाचा हा मुलगा आहे, मात्र राजकारणाच्या रणांगणात हे पाणी कितपत टिकणारे आहे हे आजमावले गेलेले नाही. त्याच्या पाठीशी बाळासाहेबांची पुण्याई आहे. बाळासाहेबांनी शरद पवारांच्या कन्येच्या उमेदवारीला पक्षीय राजकारण दूर ठेवून पाठिंबा दिला होता. त्यामुळे पवारांची यावेळी काय भूमिका राहील ते महत्त्वाचे असेल. उद्या महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी आदित्यचे नाव सेनेने पुढे केले तर भाजपापुढे पेच अटळ आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सेनेचा घोडा आपल्या पुढे दौडू नये हे भाजप पाहील. दोन्ही पक्ष जरी एकत्र आलेले असले तरी तत्पूर्वी एकमेकांवर भरपूर राडारोडा उडवून झालेला आहे. त्यामुळे निकालांनंतरही पुन्हा एकमेकांना बेटकुळ्या दाखवल्या गेल्या तर आश्चर्य वाटायला नको. गणित शेवटी जिंकल्या जाणार्‍या जागांवर अवलंबून असेल!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पूर्वनियोजन गरजेचे

कोरोनाविरुद्धची भारताची लढाई आता हळूहळू अंतिम, निर्णायक टप्प्यात येऊ लागली आहे. जगभरामध्ये कोरोनावरील लशींचे संशोधनही अंतिम टप्प्यात आलेले असून वैद्यकीय चाचण्यांची तिसरी...

लशीकरणाची पूर्वतयारी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन ः मुख्यमंत्री

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी काल कोविडप्रश्‍नी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नागरिकांचे प्राण वाचविणे हेच मुख्य ध्येय

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी, आठ राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी हे सरकार अग्रक्रमाने प्राधान्य...

कोरोनाने मंगळवारी दोघांचा मृत्यू

राज्यात चोवीस तासात नवीन १६७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाने...

गोमेकॉत केवळ प्रवासासाठी कोविड चाचणी नाही ः राणे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ आणि आरोग्य संचालनालयाला केवळ प्रवासासाठीची कोविड चाचणी न करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे...

ALSO IN THIS SECTION

पूर्वनियोजन गरजेचे

कोरोनाविरुद्धची भारताची लढाई आता हळूहळू अंतिम, निर्णायक टप्प्यात येऊ लागली आहे. जगभरामध्ये कोरोनावरील लशींचे संशोधनही अंतिम टप्प्यात आलेले असून वैद्यकीय चाचण्यांची तिसरी...

संकटाची चाहुल

गोव्यातील नव्या कोरोना रुग्णांची आकडेवारी अत्यंत नगण्य असल्याचे आरोग्य खात्याची आकडेवारी दर्शवू लागली आहे. रविवारी फक्त ७८ नवे कोरोनाबाधित राज्यात आढळून आल्याचे...

खायचे दात

जम्मूमधील नगरोटामधील बन टोल नाक्यावरील चकमकीत जैश ए महंमदचे चार दहशतवादी गेल्या गुरुवारी पहाटे मारले गेले. मात्र, त्यानंतरच्या तपासकामातून या दहशतवाद्यांसंबंधीचे जे...

काळजी घ्या

राज्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग नियमित स्वरूपात सुरू करण्याचा घाट राज्य सरकारने आजपासून घातला आहे. सरकारने त्यासंदर्भात कागदोपत्री आदर्श वाटणारा एस. ओ....

ओबामांचा चष्मा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ मध्ये त्यांनी राहुल गांधींवर केलेल्या शेरेबाजीवरून देशात वादळ उठले आहे. अजून हे पुस्तक...