दक्षिण रशियातील या शहरातील एका रेल्वे स्थानकावर एका महिला आत्मघाती बॉंबरने स्वत:ला उडवून लावल्यामुळे १८ जण ठार व ४० लोक जखमी झाल्याची माहिती विभागीय रेल्वे अधिकार्यांनी दिली.
धातूशोधक (मेटल डिटेक्टर) असलेल्या प्रवेशद्वाराच्या नजीक सदर महिलेला थांबविल्यानंतर त्या महिलेने अंगावरील बॉंबचा चार्जर ओढला. यावेळी नववर्षानिमित्त मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती. या शक्तीशाली स्फोटामुळे स्थानकाच्या दुमजली इमारतीच्या खिडक्याही तुटून पडल्या. अनेकजण दूरवर फेकले गेले. या दहशतवादी कृत्याच्या चौकशीस प्रारंभ करण्यात आल्याची माहिती रशियाच्या दहशतवादविरोधी समितीच्या अधिकार्याने दिली.
आत्मघाती बॉंबर हल्लेखोर महिलेचे तुटलेले शिर ताब्यात घेतल्याचे या अधिकार्याने सांगितले.
रशियाच्या संपूर्ण उत्तर प्रांतात इस्लामी राज्याची स्थापना करण्याची दहशतवाद्यांची मागणी आहे. या दहशतवाद्यांचा म्होरक्या डोकू उमारोव याने या प्रांताबाहेरील नागरिकांवर हल्ला करण्याचा आदेश आपल्या समर्थकांना दिले आहेत.