आता पैसे पाठवा ईमेलद्वारे!

0
143

कदाचित २०३० नंतर चलन वापरणे नव्या पिढीच्या अंगवळणीही पडणार नाही. येत्या दहा वर्षांत आपणा सर्वांच्या जीवनशैलीमध्ये विलक्षण बदल होणार आहेत. आज आपण अनेक प्रकारची इलेक्ट्रॉनिक (आणि इतरही) उपकरणे वापरतो, ज्यांना गॅजेट्‌स म्हटले जाते. ह्या गॅजेट्‌सच्या स्वरुपात आणि त्यांच्या कार्यक्षमतेमध्येही आश्‍चर्यजनक ठरावी अशी क्रांती होणार आहे. आजची दोन-तीन साधने (म्हणजेच गॅजेट्‌स) एकत्र करून नवीन सर्वसमावेशक वस्तू बनवली जाईल. येत्या काही वर्षांत संगणक, इंटरनेट आणि त्यांसंबंधीच्या विविध प्रणाली आपल्या दैनंदिन जीवनाचा, आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा रीतीने अविभाज्य भाग बनणार आहेत. माणसाच्या हाताच्या कातडीमध्येच पेमेंट करणारी अतिसूक्ष्म यंत्रणा थेट बसवण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. म्हणजे पाहा, आपणांस कार्डसुद्धा बाळगण्याची गरज नाही! व्यवहारास संमती देण्यासाठी ङ्गक्त त्या यंत्राच्या स्कॅनरपुढून बोट ङ्गिरवले की झाले!बदलांच्या या प्रक्रियेमध्ये आजकालचे आणखी एक महत्त्वाचे यंत्र आपण विसरतो आहोत ते म्हणजे मोबाईल ङ्गोन. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातले भविष्यवेत्ते, अगदी कालपरवापर्यंत, तंत्रज्ञानाच्या घोडदौडीचे वर्णन एका वाक्यात करीत असत – ‘सर्व दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी आपली कार, आपला मोबाईल ङ्गोन आणि आपले क्रेडिट कार्ड ह्या तीन वस्तू पूर्णपणे समर्थ आहेत, बाकी काहीही बाळगण्याची गरज नाही.’ पण आता मोबाइलकडूनच क्रेडिट कार्डाचेही काम करून घेतले जाणार आहे आणि हा नैसर्गिक घटनाक्रम म्हणता येईल. एकवेळ माणूस त्याची कार किंवा क्रेडिट कार्ड सोबत घेऊन ङ्गिरणार नाही, परंतु त्याच्या हाती मोबाईल नसेल असा प्रसंग विरळा! ग्राहकाला हे अतिशय सोयीस्कर ठरेल आणि मोबाईल कंपन्यांनादेखील ह्यातून भरपूर ङ्गायदा होईल. कारण दरवेळी आपण क्रेडिट कार्ड स्वाईप करतो तेव्हा बिलाच्या रकमेपैकी १ ते ३ टक्के रक्कम कार्ड जारी करणार्‍या बँकेला मिळतेच.
अगदी गेल्या दशकापर्यंत, बँकेच्या एका शहरातील शाखेतून दुसर्‍या शहरातील शाखेत पैसे पाठवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागत असे, ही बाब आजच्या कोअर बँकिंगच्या ह्या जमान्यात कोणालाही खरे वाटणार नाही. याखेरीज खेडोपाड्यात पैसे पाठवण्यासाठी मनिऑर्डर, टेलिग्राङ्गिक मनिऑर्डर वगैरे उपाय करावे लागत. यामध्ये वेळ तर वाया जाईच, शिवाय भरपूर मानसिक त्रासही होत असे. इंटरनेट आणि ईमेलमुळे परस्परसंवादाच्या पद्धतींमध्ये केवढा जागतिक ङ्गरक पडला हे आता कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु खुद्द ईमेलमध्ये इतकी सुलभता, विविधता आणण्यामध्ये आणि विशेषतः ती युजर-ङ्ग्रेंडली बनवण्यामध्ये गूगलचा ङ्गार मोठा वाटा आहे हे ङ्गार थोड्या वाचकांना माहीत असेल! असो, त्याविषयी नंतर कधीतरी. आज गूगलचा प्लॅटङ्गॉर्म वापरणारी विविध साधने आपण वापरत असतो – गूगल मॅप्स, गूगल ग्लासेस, गूगल वॉलेट, स्मार्टङ्गोनमधली ऍँड्रॉइड ‘ओएस’ आणि विविध ऍप्स, गूगल हे आणि गुगल ते…आता गूगलच्या ह्या सर्वत्र-संचारामध्ये आणखी एका सुविधेची भर पडणार आहे – ईमेलला ऍटॅच करून आता चक्क पैसे पाठवता येतील!
अर्थात ही सोय सुरुवातीला (म्हणजे येत्या काही महिन्यांत) ङ्गक्त अमेरिकेतच मिळू लागेल, तीसुद्धा १८ वर्षांवरील व्यक्तींनाच (साहजिक आहे, प्रश्न पैसे हाताळण्याचा असल्यामुळे…!). परंतु खुद्द ‘गुगल’मधील उच्चपदस्थांनाच ह्या प्रकल्पात रस असल्यामुळे त्यावरील काम वेगाने पुढे सरकून ही सुविधा लवकरात लवकर सर्वदूर मिळण्याची चिन्हे आहेत. असो. तर जी-मेलच्या अमेरिकन वापरकर्त्यांना, मेल लिहिल्यानंतर तिला इतर बाबी ऍटॅच करण्याच्या संदर्भातील सध्याच्या आयकॉन्सबरोबरच, डॉलरचे एक चिन्हही दिसणार आहे. त्यावर क्लिक करुन आवश्यक ती रक्कम लिहिली आणि ‘सेंड’ वर क्लिक केले की तेवढी रक्कम त्या इमेलच्या प्राप्तकर्त्याला मिळेल. अर्थातच, आपल्या खात्यामध्ये तेवढी रक्कम असण्याची काळजी पैसे पाठवणार्‍याने घ्यायची आहे! पैसे स्वीकारणार्‍या व्यक्तीचा जीमेल-अकाउंट असण्याचे बंधन नाही; पण त्या व्यक्तीला पैसे खरेच हवे असतील तर ‘गूगल वॉलेट’ मध्ये या व्यक्तीचे खाते असणे अनिवार्य आहे! ह्यामध्ये गूगलचे दोन ङ्गायदे होणार आहेत. पहिला म्हणजे अर्थातच स्वतःच्या विविध ऍप्लिकेशन्स उर्ङ्ग ऍप्सचा जागतिक पातळीवर अधिकाधिक प्रसार घडवणे. पैसे पाठवण्याचा हा मार्ग, पारंपारिक तर सोडाच परंतु तुलनेने आधुनिक तंत्रांपेक्षाही, ङ्गारच सोपा आहे. इ-बँकिंगचे पासवर्ड लक्षात ठेवायला नकोत, दुसर्‍याला आपला खाते क्रमांक सांगायला नको…पैसे किती वेळाने मिळतील ह्याचीही चिंता नको! बरे ईमेल हाच त्या व्यवहाराचा पुरावा असल्यामुळे तोही प्रश्न नाही. दुसरा ङ्गायदा म्हणजे पैसे पाठवणार्‍याकडून – त्याने ह्यासाठी(देखील) क्रेडिट कार्ड वापरल्यास – गूगल थोडेङ्गार कमिशन घेण्याची शक्यता आहे. हे पैसे थेट बँक खात्यामधून किंवा गुगल वॉलेटमार्ङ्गत भरल्यास कमिशन घेतले जाणार नाही. प्राप्तकर्त्याला कोणतीही ङ्गी अथवा खर्च नाही.
गूगलची ही नवी सुविधा म्हणजे ‘वेस्टर्न युनियन’ किंवा ‘पेपाल’ सारख्या संस्थांना धक्का आहे हे निश्चितच! परंतु ईमेल खात्यामध्ये घुसखोरी करणे आणि त्याचा पासवर्ड मिळवणे (म्हणजेच ते हॅक करणे) ह्या कंपन्यांच्या खात्यांपेक्षा नक्कीच ङ्गार ङ्गार सोपे असल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न चांगलाच सतावणार आहे!! सर्वसामान्य वापरकर्त्यांपेक्षा हॅकर्स आणि चोरच ह्या सुविधेची अधिक आतुरतेने वाट पाहात आहेत असे तूर्त म्हणता येईल. (अर्थात गूगलने ह्याबाबत विचार केला असणारच!) ते काहीही असले तरी तंत्रज्ञानाच्या वाढत्या विस्तारामध्ये दैनंदिन मानवी व्यवहारांतील समस्यांच्या निराकरणाचा किंवा त्या सौम्य करण्याचा समावेश करून गूगल व इतरही काही कंपन्यांनी जनमानसात आपले स्थान पक्के केले आहे हे नक्कीच.