वनमंत्र्यांची माहिती
वन आणि पर्यावरण मंत्रालयाने सुमारे ९३ टक्के वृक्षांची कत्तल करण्यास कायदेशीर मान्यता दिली असून ९ लीजधारकांनी आतापर्यंत ४५ हजार झाडे कापल्याची माहिती पर्यावरण मंत्री एलिना साल्ढाणा यांनी विधानसभेला सादर केली आहे.
वन खात्याच्या नोंदीनुसार २६ खाण लीजांचा समावेश वनक्षेत्रात आहे. या लिजांमध्ये ६३ टक्के जमीन वनक्षेत्राची असल्याचे नमूद केले आहे. ३४ हेक्टर जमिनीचा समावेश असलेले आत्माराम एक्स पै पाणंदिकर यांचे लीज पूर्ण वनक्षेत्राखाली येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ९ लीज धारकांनी वरील झाडे कापण्यासाठी कायदेशीर मान्यता मिळविली होती.

