आतापर्यंत फक्त २०० एलपीजी गॅस जोडण्या रद्द करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. एकाच व्यक्तीच्या नावावर असलेल्या एकापेक्षा अधिक गॅस जोडण्या हुडकून काढण्यासाठी गॅस कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर सुमारे ३० हजार जोडण्या रोखल्या होत्या.
दरम्यानच्या काळात प्रत्येकाने आवश्यक ते दाखले सादर केले व ते सादर करण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहे.

