आणखी एका हिंदूचीबांगलादेशमध्ये हत्या

0
10

बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून काल आणकी एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी बांगलादेशमध्ये दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आता पिरोजपूर जिल्ह्यातील पलाश कांती साहा यांची निर्घृण हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.भाजप नेते अमित मालवीय यांनी, 27 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 6 वाजता पिरोजपूर जिल्ह्यातील दुमुरिया गावात इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंदूंच्या घरांवर हल्ले केले. हल्लेखोरांनी पलाश कांती साहा यांना त्यांच्या घरात कोंडून घराला आग लावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात घर जळताना आणि बाहेर उभे असलेले लोक रडताना दिसत असल्याचे म्हटले आहे.