‘आठ दिवसांत पाणी द्या; अन्यथा कर्नाटकात जाऊ’

0
15

येत्या आठ दिवसांत महाराष्ट्र सरकारने पाणी देण्याबाबत निर्णय घ्यावा; अन्यथा कर्नाटकात जाण्यास आम्ही मोकळे आहोत, असा थेट इशारा सांगलीच्या जत तालुक्यातील पाणी संघर्ष कृती समितीकडून काल देण्यात आला. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी उमदीमध्ये येऊन कॅबिनेट बैठक घेऊन जाहीर करावे, नसेल तर नवव्या दिवसापासून कर्नाटकमध्ये जाण्याची प्रक्रिया सुरू करा, असा निर्धार उमदी या ठिकाणी पार पडलेल्या पाणी संघर्ष कृती समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला.

मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गाव कर्नाटकमध्ये येणार असल्याचे विधान केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. आता ४० गावांतील पाण्यासाठी संघर्ष करणार्‍या पाणी संघर्ष कृती समितीने वेगळी आणि आक्रमक भूमिका घेतली आहे.