आज 22 जणांना सरकारी नोकरीची नियुक्तिपत्रे देणार

0
10

गोवा क्रांतिदिनी म्हणजेच दि. 18 जून रोजी स्वातंत्र्यसैनिकांच्या 22 मुलांना सरकारी नोकऱ्यांसाठीची नियुक्तिपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आता स्वातंत्र्यसैनिकांची सुमारे 10 मुलेच नोकरीच्या प्रतीक्षेत असून त्यांनाही लवकरच नोकरी मिळेल. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आतापर्यंत स्वातंत्र्यसैनिकांच्या सुमारे 75 मुलांना सरकारी नोकरी दिली. कुणावरही अन्याय होऊ देणार नसून, पात्र असलेल्या सर्वांना नोकरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.