आज विद्यार्थ्यांसोबत मोदींची ‘मन की बात’

0
87

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभर लोकप्रिय ठरलेल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता रेडिओवरून प्रसारित केला जाणार आहे. देशभरात सध्या शालान्त तसेच उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे.