आजपासून राज्यात पावसाची शक्यता

0
32

येथील हवामान खात्याने वायव्य बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली असून, यलो अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ 7.6 किमी.पर्यंत पसरलेले आहे. पुढील दोन दिवसांत ओडिशा आणि छत्तीसगडकडे ते सरकण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.