आजपासून पुन्हा लसीकरण मोहीम

0
13

आरोग्य सेवा संचालनालयातर्फे बुधवार दि. 18 जानेवारीपासून काही सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत कोविशील्ड लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे. सामाजिक आरोग्य केंद्र काणकोण, सामाजिक आरोग्य केंद्र साखळी, सामाजिक आरोग्य केंद्र पेडणे, प्राथमिक आरोग्य केंद्र केपे, प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडा, प्राथमिक आरोग्य केंद्र चिंबल, शहरी आरोग्य केंद्र मडगाव, शहरी आरोग्य केंद्र वास्को, शहरी आरोग्य केंद्र पणजी, शहरी आरोग्य केंद्र म्हापसा आणि गोमेकॉ बांबोळी या ठिकाणी मोफत लसीकरण केले जाईल. कोविड-19 प्रकरणांची अलीकडील जागतिक वाढ लक्षात घेऊन ही मोहीम राबविण्यात येत आहे. ज्यांना कोविशील्डचे दोन डोस मिळाले आहेत त्यांना कोविशील्डचा डोस सावधगिरीचा डोस म्हणून दिला जाईल. ही लस आठवड्यातून दोनदा म्हणजे दर बुधवारी (सकाळी 9 ते संध्या. 4) आणि शनिवारी (सकाळी 9 ते दुपारी 12) 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत किंवा शेवटचा साठा समाप्त होईपर्यंत दिली जाईल.