सर्वसामान्य गोमंतकीयांच्या जीवनातील एक घटक असलेल्या पावाचा दर आजपासून अडीच रुपयांवरून तीन रुपये असा वाढविण्यास सरकारने मान्यता दिली आहे.
अखिल गोवा बेकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली असता, त्यांनी त्यांना पावाचा दर अडीच रुपयांवरून तीन रुपये करण्यास मान्यता दिली. आजपासून गोव्यात तीन रुपये दराने पावाची विक्री होईल, असे संघटनेचे अध्यक्ष ए. मिनेझीस यांनी सांगितलेे. सरकारने राज्यातील बेकरीवाल्यांना पावासाठी सबसिडी देण्याचे आश्वासन दिले असून सोमवारी या योजनेची त्यांना संपूर्ण माहिती दिली जाईल.