आजपासून चार दिवस जोरदार पावसाची शक्यता

0
19

हवामान खात्याने २ जुलै ते ५ जुलैपर्यंत राज्याला पिवळा इशारा दिलेला असून, राज्यातील काही भागात या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या काळात उत्तर गोवा व दक्षिण गोव्यातील काही भागांत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. ४ व ५ जुलै रोजी राज्यातील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या काळात अरबी समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे गोवा व महाराष्ट्रातील मच्छिमारांनी मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही दिला आहे.