संपादकांशी अनौपचारिक वार्तालापावेळी दामू नाईक यांची माहिती
भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत 52 टक्के मते मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर ऊर्फ दामू नाईक यांनी काल राज्यातील संपादकांशी अनौपचारिकरित्या बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेली मते विचारात घेऊन ही संख्या निश्चित केलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीही उपस्थिती होती.
पक्षाच्या संपर्कात नसलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना जवळ आणण्याची मोहीम पक्ष सध्या राबवत असून, जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना एकत्र आणत आहे. ह्या जुन्या कार्यकर्त्यांचा एक प्रकोष्ठ निर्माण केला जाईल, असेही नाईक यांनी यावेळी सांगितले.

