28 C
Panjim
Monday, March 1, 2021

आक्रमक गोव्यासमोर मुंबईच्या बचावाची कसोटी

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जोर्गे कोस्टा यांच्या मार्गदर्शनाखालील मुंबई सिटी एफसीची गुरुवारी मुंबई फुटबॉल एरीनावर एफसी गोवाविरुद्ध कसोटी होत आहे. त्यावेळी गोव्याच्या भक्कम आक्रमणाचे आव्हान मुंबईच्या कमकुवत बचाव फळीसमोर असेल.

कोस्टा यांचा गत मोसमातील चुका टाळण्याचा प्रयत्न राहील. गेल्या मोसमात मुंबईची चार वेळा गोव्याशी गाठ पडली. यात उपांत्य लढतीचा समावेश होता. मुंबईला तीन वेळा पराभूत व्हावे लागले. यात त्यांना १२ गोल पत्करावे लागले. एकमेव विजय उपांत्य फेरीतील दुसर्‍या टप्यात झाला. तो फरक १-० असा होता. त्याआधी पहिल्या टप्यात गोव्याने ५-१ अशी बाजी मारली होती.
कोस्टा यांचा संघ इतक्या आव्हानात्मक कसोटीपूर्वी अत्यंत खराब स्थितीत आहे. त्यांना घरच्या मैदानावर ओडिशा एफसीविरुद्ध २-४ अशा धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

कोस्टा यांना बर्‍याच दुखापतींचा विचार करावा लागेल, ज्या प्रामुख्याने मधल्या फळीशी संबंधित आहेत. मॅटो ग्रजिच याला मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यांना सर्वस्वी भारतीय खेळाडूंची बचाव फळी खेळवावी लागेल. गोव्याच्या आक्रमक दृष्टिकोनाच्या संघाविरुद्ध त्यांना अत्यंत दक्ष राहावे लागेल.
स्टार फॉरवर्ड मोडोऊ सौगौ हा सुद्धा मैदानावर पडल्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे कोस्टा यांचे आक्रमणातील पर्याय आणखी कमी झाले आहेत. ओडिशाविरुद्धच्या लढतीपूर्वी जायबंदी झालेला रॉलीन बोर्जेस हा सुद्धा खेळू शकणार नाही.

पोर्तुगालच्या कोस्टा यांनी सांगितले की, ओदीशाविरुद्धच्या पराभवानंतर मी खेळाडूंशी चर्चा केली. आम्हाला चुकांवर मात करावी लागेल. त्या टाळण्यासाठी आम्हाला खेळावर लक्ष केंद्रीत ठेवावे लागेल. फुटबॉलमध्ये तुम्ही फाजील आत्मविश्वास बाळगलात तर ती समस्या ठरते. मला सोप्या लढतीची अपेक्षा नाही, पण गोवा सुद्धा सोप्या लढतीची अपेक्षा बाळगत नसेल याची मला खात्री आहे. आम्हाला त्यांच्याविषयी आणि त्यांना आमच्याविषयी आदर वाटतो.

मुंबईचा संघ थोडा पिछाडीवर राहून संघटीत खेळतो अशी ओळख असली तरी सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाच्या वेग आणि शैलीविरुद्ध त्यांना नेहमीच झगडावे लागले आहे.
यंदा मात्र गोव्याचा संघ अगदी सर्वोत्तम फॉर्मात आहे असे नाही. चेन्नईनवरील ३-० अशा विजयानंतर त्यांना बंगळुरू एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्याविरुद्ध बरोबरीसाठी संघर्ष करावा लागला. मुख्य म्हणजे दोन्ही सामन्यांत त्यांना बरोबरीच्या गुणासाठी गोलकरीता भरपाई वेळेपर्यंत प्रतिक्षा करावी लागली.
फेरॅन कोरोमीनास याच्या खात्यात दोन गोल जमा झाले आहेत, पण ह्युगो बुमूस याला दुखापत झाली. त्यातून तो सावरला आहे. एदू बेदीया सुद्धा जायबंदी होता. यामुळे गोव्याच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.

मुंबईमध्येच गोव्याला आयएसएलचा अंतिम सामना गमवावा लागला होता. त्यामुळे या मैदानवर परतल्यानंतर काही कटू आठवणी जाग्या होऊ शकतात. आपला संघ भावनिक आव्हानावर मात करेल आणि तीन गुण खात्यात जमा करेल यासाठी लॉबेरा प्रयत्नशील राहतील.
लॉबेरा यांनी सांगितले की, मुंबईविरुद्ध ५-१ असा विजय आमचा संघ लक्षात ठेवेल अशीच माझी पसंती राहील. मला वाटते की प्रत्येक सामना वेगळा असतो. हा सामना अवघड असेल, कारण आम्ही एका फार चांगल्या संघाविरुद्ध खेळणार आहोत. भूतकाळ आमच्यासाठी महत्त्वाचा नाही.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम

दत्ता भि. नाईक आगामी मार्च-एप्रिलच्या काळात आसाम, प. बंगाल, तामिळनाडू व पुदुचेरी अशा तीन राज्यांत व एका छोट्याशा...

‘एलआयसी’ अंतर्बाह्य कशी आहे?

शशांक मो. गुळगुळे आतापर्यंत खाजगी कंपन्यांच्या भागभांडवल विक्रीपेक्षा सरकारी कंपन्यांच्या भागभांडवल विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि या...

खांडेकर-कुसुमाग्रज-बोरकर अनोखा त्रिवेणी संगम

राम देशपांडे भाऊंनी पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी साहित्याच्या क्षेत्रावर अधिराज्य केले. स्वतःचा असा एक वेगळा ठसा मराठी मनावर...

अस्त

अंजली आमोणकर देहोपनिषद सिद्ध झालं म्हणजे देहकथा पूर्ण झाली. विसर्जनाची वेळ झाली. गीतेत म्हटले आहे- ‘तू त्रिगुणातीत हो!’...

फुटीच्या दिशेने?

कॉंग्रेस पक्षामधील असंतोष पुन्हा खदखदू लागला आहे. शनिवारी जम्मूमध्ये गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेतील निवृत्तीच्या निमित्ताने आयोजित ‘शांती संमेलना’तील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते...

ALSO IN THIS SECTION

आजपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा

>> राज्यात ३७ केंद्रांची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांना लस देणार राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती १ मार्च २०२१ पासून वाढविण्यात...

पालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज वाढण्याची अपेक्षा

>> आतापर्यंत २६ अर्ज दाखल, ४ मार्चपर्यंत मुदत राज्यातील पणजी महानगरपालिका, अकरा नगरपालिकांच्या २० मार्च २०२१ रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी...

नावेली पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसची कुतिन्होंना उमेदवारी

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांना काल जाहीर करण्यात आली.गोवा...

पालिका आरक्षणाबाबत आज निवाड्याची शक्यता

राज्यातील अकरा नगरपालिका निवडणुकीतील आरक्षण आणि फेररचनेला आव्हान देणार्‍या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ सोमवार १ मार्च २०२१ रोजी निवाडा देण्याची...

जलशक्ती मंत्रालय राबवणारजलसंधारण मोहीम ः मोदी

>> ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रविवारी सकाळी ११ वाजता आपल्या मासिक ‘मन की बात’च्या...