आके येथे एका निवासी खोलीस आग लागून विजया आडपईकर (७५) ही महिला आगीत होरपळून ठार झाली. अग्नीशामक दलाने तातडीने कारवाई करत आग विझवली.
आग लागली ती खोली असलेल्या इमारतीचे काम चालू आहे. आत वीजही नव्हती. गॅस सिलिंडरही व्यवस्थित होता. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

