आंबे प्रेमींना आता मिळणार ‘योगी’ आंबा

0
106

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाने आता आंबे प्रेमींना ‘योगी आंबा’ मिळणार आहे. शहरातील प्रसिध्द आंबे उत्पादक पद्मश्री हाजी कलीमुल्ला यांनी हा नवा आंबा विकसित केला आहे. ७४ वर्षीय कलीमुल्ला यांनी या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही एका आंब्याला दिले होते. योगी आंबा अजून पिकलेला नसून त्याचा स्वाद कसा असेल ते सध्या सांगता येत नसल्याचे कलीमुल्ला म्हणाले.