Home बातम्या आंध्र, तामीळनाडूला नीलम वादळाचा धोका

आंध्र, तामीळनाडूला नीलम वादळाचा धोका

0

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दबावाच्या पट्‌ट्याचे आता नीलम’ वादळात रुपांतर झाले असून ते काल चेन्नईपासून ५०० किलोमिटर समुद्रात पोचले होते. हे वादळ आंध्र पप्रदेश व तामीळनाडूच्या किनारपट्यांना आज धडक देण्याची शक्यता आहे.

वादळासंबंधी इशारा देणार्‍या सीडब्लूसीच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, हे वादळ आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत तामीळनाडूचा उत्तरेकडील भाग व आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील भागात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

यामुळे तामीळनाडू व पुडुचेरीत मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस येते ३६ तास चालूच राहण्याची शक्यताही वर्तविली आहे. दक्षिण आंध्र प्रदेशातही जोरदार पर्जन्यवृष्टी होईल. या काळात ६५ कि.मी. वेगाने वारे वाहतील. हे वारे जसजसे किनार्‍यालगत पोचतील तसा त्यांचा वेग आणखीन वाढेल. समुद्र अतिशय खवळलेला राहणार असून मच्छीमारांनी समुद्रात प्रवेश करू नये असे कळविण्यात आले आहे.