राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायटेड नेशन्स’च्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त काल देशभरातील तरुणांशी अर्थात ‘जेन झी’शी संवाद साधला. दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोनाच्या पार्श्वभूमीवर जेन झीबाबत त्यांनी मोठे विधान केले. आंदोलन केल्याने जेन झी हे देशविरोधी ठरत नाहीत, तर ते आमच्या पिढीपेक्षा अधिक देशभक्त आहेत, असे विधान मोहन भागवत यांनी केले. आयआयएमयूएनचे संस्थापक ऋषभ शाह यांनी त्यांची मुलाखत घेतली.

