वोडाफोनचे आवाहन
आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून तुम्हाला जर मिस्ड कॉल आला असेल तर पुन्हा त्या क्रमांकाशी संपर्क करताना सावधगिरी बाळगा असे आवाहन वोडाफोनकडून करण्यात आले आहे.
वोडाफोन ग्राहकांनी केलेल्या तक्रारींनुसार त्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून मिस्ड कॉल्स येत असून त्या क्रमांकाशी पुन्हा संपर्क केला असता भरमसाठ भाडे आकारले जात आहे. यासाठी ग्राहकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
परवापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारचे कॉल्स येत होते तामीळनाडूतही अशा मिस्ड कॉल्सची नोंद झाल्याचे वोडाफोनच्या सूत्रांनी सांगितले. वोडाफोन सध्या या प्रकाराची चौकशी करीत आहे. वोडाफोनचे देशात १४० दशलक्ष ग्राहक असून त्यांनी अशा मिस्ड कॉल्स टाळावे, असे आवाहन केले आहे.