– रुद्राजी ज. शेणवी केंकरे
अलीकडेच केलेल्या एका भाषणात आपल्या गोव्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात गोमंतकीय संशोधक फार कमी प्रमाणात दिसून येतात याबाबत खेद व्यक्त केला. त्यांच्या या वक्तृत्वात वस्तुस्थितीची जाणीव तर आहेच, तशी हळहळ पण आहे. या निमित्ताने काही माजी तर काही नवोदित संशोधकांबाबतची माहिती तरुण पिढीला व्हावी ह्या हेतूने फिरून एकवार लिहिण्यास सुरुवात करीत आहे.
१९७८ च्या आसपास कंपनीच्या कामकाजाच्या निमित्ताने मी पॅरिस शहराला भेट दिली असता एक दिवस हातातले काम लवकर आटोपल्या कारणाने शहरातील महत्त्वाची स्थळे पाहत पायी फिरत असताना एकाएकी झरीींर्शीी खपीींर्ळींीींश ची भव्य इमारत नजरेस आली आणि साहजिकच पाय तिकडे वळले. ही अतिभव्य अशी इमारत जगातले एक फार मोठे आणि नावलौकिकास पावलेले जंतुशास्त्रातील संशोधन केंद्र आहे याची मला माहिती होती. या वास्तूला भेट देण्याचा योग आला हे माझे सद्भाग्य समजतो. आत शिरल्यावर एका भव्य दालनात प्रवेश होतो. या हॉलमध्ये गेल्या २-३ दशकांतील नावलौकिकास पावलेल्या जंतुशास्त्र आणि वैद्यकीय संशोधनात गुंतलेल्या प्रसिद्ध संशोधकांचे फोटोग्राफ्स लावलेले दिसत होते. संपूर्ण सभागृह फिरून ते फोटोग्राफ्स बारकाईने पाहता पाहता अर्धा तास निघून गेला आणि तद्नंतर परतण्याच्या तयारीत असता एक सद्गृहस्थ लहानशा ऑफीसमधून बाहेर आले आणि काही मदत हवी का? अशी फ्रेंच भाषेत चौकशी करू लागले. मला थोडीशी फ्रेंच भाषा येत होती आणि सहज चक्कर मारण्यास आलो असा खुलासा केला. त्यावर त्यांनी माझ्या मायदेशाचे नाव विचारले आणि माझ्या गोमंतकाचे नाव घेतल्यावर त्यांनी मला डॉ. फ्रोइलानु डिमेेलो यांच्या फोटोग्राफजवळ नेऊन हे पहा तुमच्या देशातील फार मोठे जंतुशास्त्रज्ञ. त्यांच्या कार्याबद्दल इन्स्टिट्यूटला फार मोठा अभिमान आहे अशा शब्दांनी डॉ. डिमेलोंचा गौरव केला. या गृहस्थांकडे सुमारे अर्धा तास डॉ. डिमेलोंबद्दल बोलल्यावर त्यांची रजा घेऊन मी हॉटेलवर परतलो.
डॉ. डिमेलो या जगप्रसिद्ध संशोधकाबाबत मला साधारणशी माहिती होती. माझे वडील डॉक्टर होते आणि ते गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेताना डॉ. डिमेलो मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर (डीन) होते. परंतु त्यांच्या अफाट कार्याबद्दल केवळ जुजबी अशी माहिती होती. १९४० ते १९४५ या काळात मी ‘लीसेव’मध्ये शिक्षण घेताना डॉ. डिमेलो यांना भेटण्याचा बर्याच वेळी प्रसंग आला असावा; परंतु त्यांचे कार्यक्षेत्र केवढे प्रचंड होते याची जाणीव पॅरिसच्या त्या भेटीनंतर झाली. आणि ती माहिती वाचकांसमोर ठेवून कुणी तरी होतकरू गोमंतकीयास प्रोत्साहन देणारी ठरावी या एकमेव हेतूने हा लेख लिहीत आहे.
डॉ. डिमेलो यांचा जन्म १८८७ साली गोव्यातील बाणावली गावात झाला. उेपीींरपलळे ऋीरपलळीले वश चशश्रे आणि ऊशश्रषळपर ठेवीळर्सीशी हे त्यांच्या वडिलांचे आणि मातोश्रींचे नाव. वडील वकील तर मातोश्री डॉ. ठरर्ळाीपवे तशपरपलळे ठेवीळर्सीशी या पोर्तुगालच्या कोईंब्रा या सुप्रसिद्ध शहराचे मेयर यांची सुपुत्री. काही काळानंतर वडील गोव्यात परतल्यावर त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये डायरेक्टर म्हणून काम केले. डॉ. फ्रोईलानु अवघे १२ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले आणि कुटुंबावर वाईट दिवस ओढवले. तुटपुंज्या उत्पन्नावर दिवस काढताना अभ्यासक्रम चालू ठेवणे डॉ. डिमेलोना एक आव्हानच ठरले. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी ‘डॉक्टर’ ही वैद्यकीय पदवी प्राप्त करून घेतली आणि पोर्तुगालमधील प्रसिद्ध ‘ओ पोर्तु’ युनिव्हर्सीटीमधून फिरून एकवार डॉक्टर ही पदवी संपादन केली. याशिवाय याच विद्यापीठातून ‘उष्ण कटिबंधातील काही खास रोगांबाबत’ विशेष अभ्यास करून पदविका मिळवून ते १९१० साली गोव्यात परतले.
वयाच्या २३ व्या वर्षी इ. सन १९१० मध्ये पोर्तुगालहून परतल्यावर डॉ. डिमेलो यांची गोवा मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली. साधारण तीन वर्षांनंतर त्यांना जगप्रसिद्ध सोरबोर्न या फ्रेंच युनिव्हर्सीटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली. पॅरिस येथे काम करीत असताना १९२१ साली पोर्तुगालच्या ‘ओ पोर्तो’ या युनिव्हर्सीटीमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली. पॅरिस आणि ओ पोर्तो विद्यापीठांमध्ये काम करीत असताना १९१४ साली फिरून एकवार त्यांची गोवा मेडिकल कॉलेजच्या इरलींशीळेश्रेसळलरश्र खपीींर्ळींीींश, जी संस्था एका लहान शेडच्या रूपाने आजच्या कांपाल या भागात होती तिचे डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली. याच वास्तूमधे १९१४ ते १९४५ या काळात डॉ. डिमेलो यांनी अतिशय महत्त्वाचे ठरावे असे चळलीेलळेश्रेसू रपव झरीरीळींेश्रेसू या क्षेत्रांत संशोधन करून जगभर प्रसिद्धी मिळविली. या क्षेत्रांतील त्यांच्या संशोधनाबाबतचे लिखाण एकाचवेळी पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी भाषांत प्रसिद्ध होऊन जगभर कीर्तीस पावले हे विशेष. त्यांच्या या उपलब्धीनंतर डॉ. डिमेलो यांची मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून नेमणूक करण्यात आली.
याच काळात (१९१४-१९४५) डॉ. डिमेलो यांनी बर्लीन या शहरामधील ‘कायझर बिह्यम इन्स्टिट्यूट’ या जगप्रसिद्ध संस्थेमधून झरीरीळींेश्रेसू या विषयावर पदव्युत्तर पदवी मिळविली. याशिवाय पोट्सडॅम या जर्मन शहरातील विद्यापीठामधून याच विषयावर डिग्री मिळविली (१९२२-२८). याच सुमारास पोर्तुगीज सरकारने डॉ. डिमेलो यांना त्यांच्या जंतुशास्त्रावरील अपूर्व अशा कार्याचे मूल्यमापन करून पोर्तुगीज सरकारने पोर्तुगीज लष्कराच्या मेडिकल तुकडीचे कर्नल असा सन्मानाचा हुद्दा १९२२ साली बहाल केला. यावेळी डॉ. डिमेलो केवळ ३५ वर्षांचे होते. आणि त्या काळात हा सन्मान फार महत्त्वाचा गणला जात असे. आणि त्यांनी अफाट अशा जनतेच्या वैद्यकीय सेवेमुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला असे मानले जात असे. त्यांची ही सेवा गोवा, दमण, दीव आणि आंगोला या विस्तृत क्षेत्रांत पसरली होती. याच काळात डॉ. डिमेलो यांनी क्युबा या देशात महारोगावरील परिषदेसाठी पाठविण्यात आलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. आणि याच विषयावर तद्नंतर आणखी सुमारे ४० परिषदांमध्ये भाग घेतला. १९१४ साली लखनौ इथे योजण्यात आलेल्या परिषदेमध्ये सक्रिय भाग घेतला. त्यांच्या या कार्यामुळे प्रभावित तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल यांच्या खास विनंतीनुसार चशवळलरश्र चूलेश्रेसू या विषयावर प्रदीर्घ असे व्याख्यान दिले. तोपर्यंत त्यांना उष्ण कटिबंधांतील खास रोगांचा सामना करण्याच्या कार्यामुळे जगभर या क्षेत्रांतील तज्ज्ञ म्हणून मान्यता मिळाली होती. एवढ्या लहान वयात डॉ. डिमेलो यांना मिळालेले यश अतुलनीय असे आहे. याच काळात त्यांचे अशा रोगांबाबतचे सुमारे २०० शोधनिबंध पोर्तुगीज, इंग्रजी आणि फ्रेंच भाषांत प्रसिद्ध झाले होते. याच काळात डॉ. डिमेलो यांनी गोव्यात इेश्रशींळा ॠशीरश्र वश चशवळलळपर, र्ईिींळेेी खपवे-र्झेीींीर्सीशीशी वर चशवळलळपर श कळीींेीळर छर्रींीीरश्र आणि र्ईिींळपेी वर एीलेश्रर चशवळलर उर्ळीीीसळसळलर वश र्छेींर-ॠेर. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘ अ श्रर तशळश्रश्रश र्वी उशपींशपपरळीश‘ नावाचा लेख गोवा मेडिकल कॉलेजच्या शताब्दीबद्दलचा होता, त्यामुळे हे मेडिकल कॉलेज जागतिक कीर्तीचे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. केवळ वैद्यकीय क्षेत्रात कर्तबगारी दाखवून डॉ. डिमेलो चमकले अशातला प्रकार नाही. १९४६ साली बंगाली कवी कै. रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनावर एक खास लेख लिहून (ज उरपींे वर तळवर वर झेशीळर ढरसेीशरपर) (डेपसी ेष श्रळषश ळप झेशींीू ेष ढरसेीश) त्यांच्या कवितेचा खास गौरव केला. याच साली डॉ. डिमेलो यांना ठेूरश्र ईळरींळल डेलळशींू ेष इशपसरश्र या संस्थेचे सदस्य नेमण्यात आले. तद्नंतर खपवळरप अलरवशू ेष डलळशपलशी डेलळशलींश वश झरींेश्रेसळल एुेींर्ळिींश रपव इळेश्रेसश वश झरीळी, डेलळशींश वश उळर्शीलळरी चशवळशरी आणि डेलळशवरवश वश एींळपेश्रेसळर श अपींीेिेश्रेसळर याशिवाय डेलळशींू ेष सशेसीरहिळर लिस्बन या संस्थांनीही त्यांना सदस्यत्व बहाल केले. १९३८ साली नेदरलँड या देशाच्या राणीसाहेबा, १२ वे पोप पायस, क्युबाचे राष्ट्रपती रामोन ग्राव आणि ब्राझीलचे राष्ट्रपती गास्पार दुत्रा यांनी १९५० साली डॉ. डिमेलो यांचा खास सत्कार केला. पोर्तुगीज राजवटीकडून कितीतरी सन्मानार्थ पदके त्यांना बहाल करण्यात आली. वाचकहो, डॉ. डिमेलो यांचे कार्यक्षेत्र आणि कार्याची दिशा प्रचंड आणि जगभर पसरलेली अशी असून त्याची जंत्री वाचकांपुढे ठेवताना या सिद्धीला अंत नसावा असा भास होतो. हे सर्व गोमंतकीयांना फार अभिमानाचे वाटावे असे आहे.
कार्यक्षेत्र
गोवा प्रदेश क्षयरोग आणि मलेरिया या रोगांपासून मुक्त करणे हे डॉ. डिमेलो यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. महारोगावर तर त्यांनी लढाच सुरू केला होता. या दिशेने त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळून दोन महत्त्वाच्या संस्था स्थापन करण्यात आल्या. मकाझान, सासष्टी येथे १९३४ साली आशिया खंडातली पहिली लेप्रोझारीय स्थापन करण्यात आली. यांपैकी ‘लेप्रोझारीय फ्रोईलानु दमेलु’ माकाझान येथे तर दुसरी सांतइनेज, पणजी येथे स्थापन करण्यात आली. या संस्था आजही कार्यरत आहेत. याशिवाय मडगाव येथे क्षयरोग केंद्रित सानाटोरियम आणि दुसरा महारोगविरोधी वॉर्ड दमण येथे स्थापन करण्यात आला. १९२६ मध्ये जुन्या गोवा शहरात मलेरियाचा कहर झाला असताना या शहरातील एकूण ४८०० विहिरी डॉ. डिमेलो यांच्या नेतृत्वाखाली साफ करण्यात आल्यामुळे मलेरियाच्या खास डासांचा प्रभाव कमी होत गेला. आणि त्यांना गोव्यातून मलेरियाचे उच्चाटन करण्यात यश मिळाले (१९२०).
तद्नंतर डॉ. डिमेलो यांनी शहरी आरोग्य सुधारणेकडे लक्ष वळविले. या दृष्टीने शहरी आरोग्य पोलीस नेमण्याची व्यवस्थाही करण्यात आली. तद्नंतर काही काळाने ते पणजी शहराचे मेयर असताना बेवारशी कत्र्यांना पकडून नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. ज्यामुळे ‘रॅबिज’सारखा रोग आटोक्यात आणता आला. याशिवाय विषारी साप पकडणार्यांना बक्षिसास पात्र करून सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी करण्यात मदत झाली. शहरी आरोग्य सुधारणेच्या दिशेने डॉ. डिमेलो यांच्या मोहिमेस भरपूर यश मिळून ते कौतुकास पात्र ठरले. येणार्या पिढींना फार मोठे मार्गदर्शन ठरावे असे त्यांचे चरित्र आहे.
पणजी शहराचे मेयर
१९२६ साली डॉ. डिमेलो गोव्याच्या वतीने पोर्तुगीज पार्लमेंटवर निवडले गेले. दुर्दैवाने २८.५.१९२६ रोजी झालेल्या उलथापालथीत पार्लमेंटची निवडणूक रद्द करण्यात आली. तद्नंतर १९ वर्षांत ती परत घेण्यात आली नाही. या काळात डॉ. डिमेलो (१९३८-४५) पणजी शहराचे मेयर म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी गलथान कारभार साफ करून शिस्तीचे धडे घातले. लाचलुचपतीचे अड्डे नष्ट करण्यात आले. अर्थसंकल्पातील तफावत कमी करण्यात यश मिळविले आणि शहरी सुधारणा वेगाने हाती घेण्यात आल्या. १९४० साली डॉ. डिमेलो यांनी शहरी सुधारणांकडे लक्ष दिले. खास करून पणजी चर्च समोरचा चौक, आताच्या १८ जून रस्त्याचे रुंदीकरण आणि कांपाल म्हणून जाणल्या गेलेल्या शहरी विभागाचे सौंदर्यीकरण केले. मेयर या नात्याने केलेले त्यांचे कार्य नेत्रदीपक असून आताच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे. एक खास योजनेखाली त्यांनी पणजी शहराच्या जुन्या बसस्टँडपासून थेट कांपालपर्यंतचा कठडा बांधून घेऊन शहराच्या सौंदर्यांत बरीच भर घातली. (तद्नंतरच्या सुधारणा आताचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कारकिर्दीत झाली आहे.) याशिवाय क्युबा देशाकडून बर्याच वृक्षांची रोपे मागवून पणजी शहरात ठिकठिकाणी रोपण्यात आली. अशा रीतीने शहरी सौंदर्यीकरणात भर घातली. अशी नावाजलेली झाडे लावण्यात आली, ज्याठिकाणी पूर्वी केवळ नारळ आणि चिकूची झाडे लावण्यात येत असत.
१९४५ मध्ये पोर्तुगीज पार्लमेंट फिरून एकवार कार्यरत करण्यात आला. आणि दुसर्यांदा डॉ. डिमेलो यांना खासदार म्हणून गोव्याच्या वतीने कार्य करण्याची संधी मिळाली. १९४५ ते १९४९ या काळात त्यांनी पार्लमेंटमध्ये निर्भीडपणे बोलून गोव्याचे हितचिंतक या नात्याने महत्त्वाची कामगिरी केली. डॉ. डिमेलोंचा निर्भीडपणा आणि कार्यपद्धती तत्कालीन हुकूमशहा डॉ. सालाझार यांना पसंत पडली नाही. परिणामी त्यांनी पार्लमेंटमध्ये केलेली भाषणे सेन्सॉर करण्यात येऊ लागली, ज्यामुळे डॉ. सालाझार यांच्या राजवटीचे खरे स्वरूप उघडकीस येऊ लागले. यामुळे दुखविले गेलेले डॉ. डिमेलो यांनी काही खास संमेलनात भाग घेऊन डॉ. सालाझार यांच्या राजवटीचा धिक्कार केला आणि गोवा या राजवटीतून मुक्त करण्याचे आपले विचार मांडले. याचा परिणाम म्हणून पोर्तुगीज कोलोनियल ऍक्ट, १९३० ज्यामुळे खास पोर्तुगालचे नागरिक आणि इतर नागरिक यामध्ये करण्यात येणारा भेदभाव, ज्यामुळे गोव्यातील जनतेला दुय्यम नागरिकांचा दर्जा भोगावा लागत असे हा कायदा रद्दबातल करून घेण्यात (१९५०) मध्ये यश मिळाले. डॉ. डिमेलो आणि इतर साथीदारांच्या प्रयत्नामुळे पोर्तुगीज कोलोनियल ऍक्ट, १९३० हा वंशभेट करू पाहणारा कायदा रद्दबातल झाला. यामुळे डॉ. डिमेलो यांना सत्तेवर असलेल्या एीींरवे र्छेींे या राजवटीचा रोष पत्करावा लागला हे सांगणे न लगे.
अखेरचे दिवस
पोर्तुगालहून गोव्यास परतल्यावर त्यांना फिरून एकवार पार्लमेंट निवडणुकांसाठी उभे राहण्याचे तिकीट देण्यात आले नाही. १९५० मध्ये ब्राझील येथे ५ींह खपींशीपरींळेपरश्र उेपसीशीी ेष चळलीेलळेश्रेसू या संस्थेचे अधिवेशन ब्राझील देशात भरणार होते. या विषयावरील कार्यास पात्र ठरलेले डॉ. डिमेलो शिवाय अन्य कोणीही नसताना डॉ. सालाझारच्या राजवटीने डॉ. डिमेलो यांचे नाव कटाक्षाने वगळले. पोर्तुगालच्या या प्रतिनिधी मंडळात डॉ. डिमेलो नव्हते. तरीसुद्धा त्यांचे या क्षेत्रातील अफाट कार्य लक्षात घेऊन ब्राझिल सरकारने याबाबतचे सर्व संकेत मोडीत काढून डॉ. डिमेलो यांना खास निमंत्रण दिले आणि त्यांची ब्राझीलमध्ये राहण्याची खास व्यवस्था करून त्यांचा गौरव केला. याचा परिणाम म्हणून की काय डॉ. डिमेलो यांनी १९५१ मध्ये ब्राझील देशाचे नागरिकत्व पत्करले आणि ते सॅन पावलो या शहरात स्थायिक झाले, ज्याठिकाणी त्यांचे दोन मुलगे अगोदरच स्थायिक झाले होते. तिथेही रिकामे न बसता त्यांनी झीेींेूेर या क्षेत्रातील आपले संशोधन कार्य चालूच ठेवले. बरेच नवेनवे झीेींेूेर शोधून काढण्यात ते यशस्वी झाले आणि ती संशोधनकार्ये त्यांनी आभारपूर्वक ब्राझील देशाला बहाल केली. ठळे वश गरपशळीे आणि डरप झर्रीश्रे या दोन शहरांत त्यांनी बरीच व्याख्याने देऊन या संशोधन कार्यात प्रगती करू शकणार्या संस्था स्थापन करण्यात ब्राझील सरकारला बरेच योगदान दिले. तिथे केलेल्या काही महत्त्वाच्या संशोधनाबाबतचे शोधनिबंध फेब्रुवारी १९५५ मध्ये, त्यांच्या मृत्यूनंंतर एका महिन्यात प्रसिद्ध करण्यात आले.
खाजगी जीवन
डॉ. डिमेलो यांचा विवाह दोनदा झाला. त्यांची पहिली पत्नी जिनीव्हा येथील श्रीमंत घराण्यातील होती, जिला घेऊन ते गोव्यात परतले. याच बाईने रवींद्रनाथ टागोर यांचे लिखाण फ्रेंच भाषेत भाषांतरित केले. पोर्तुगालच्या ओ पोर्तो शहराच्या भेटीवर असताना १९२१ मध्ये स्पॅनिश फ्लूमुळे त्यांना मृत्यू आला. १९२३ मध्ये डॉ. डिमेलो यांंनी पुनर्विवाह केला. दुसरी पत्नी ही स्वीसबाई होती. या संबंधांतून डॉ. डिमेलो यांना ६ मुले झाली. या बाईने ‘द सोल ऑफ इंडियन वूमन’ नावाचे पुस्तक जर्मन भाषेत लिहून महत्त्वाची कामगिरी केली. या पुस्तकात हिंदू चालीरीतींचा परामर्श असून आर्य आणि द्रविड संस्कृतीचा प्रभाव या विषयावर आहे. त्यांचे दोन मुलगेही नावाजलेले लेखक असून विविध क्षेत्रांत त्यांनी नावलौकिक कमवलेला आहे. खुद्द डॉ. डिमेलो यांचे लिखाण संशोधनात्मक असून प्रचंड असे आहे. त्यात मलेरिया, क्षयरोग, महारोग, सारख्या विषयांवर अत्यंत महत्त्वाचे शोधनिबंध आहेत. पीएचडी सारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक होऊ शकतील असे आहेत. अशा या थोर गोमंतकीय सुपुत्रास भेटून हस्तांदोलन करण्याचा सुयोग मला आला, हे मी माझे सद्भाग्य समजतो.

