27.6 C
Panjim
Wednesday, May 19, 2021

असे व्हायला नको होते, पण…

  • ज. अ. रेडकर
    (सांताक्रूझ)

‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान इथे पगारातून मी हप्ते भरू शकेन. इतर ठिकाणी रोख द्यावे लागले असते जे आमच्याकडे नाहीत आणि एक दोन वर्षात सर्व सुरळीत होईल’’.

सांप्रतकाळी सरकारी नोकरीत असलेल्या शिक्षकांविषयी खूप काही लिहिले जाते, बोलले जाते. शिक्षकांच्या संघटना त्यांच्या हक्कांसाठी कार्यरत असतात. मात्र निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या समस्यांविषयी कोणीच आवाज उठवीत नाही. शिक्षक निवृत्त झाला की संघटनेतील त्याचे स्थान समाप्त होते. निवृत्त शिक्षकांची आज तरी स्वतंत्र संघटना अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांच्या दुःखाला वाचा फोडणारी कोणतीही व्यवस्था नाही. ‘न घरका न घाटका’ अशी त्यांची अवस्था झालेली दिसते.

निवृत्त शिक्षकाला अधिक आदराने व सन्मानाने वागवायला हवे कारण तीस-पस्तीस वर्षे त्याने शिक्षणदानाचे पवित्र काम केलेले असते, अनेक पिढ्या त्याने घडवलेल्या असतात. याची जाणीव समाजाने आणि सरकारी खात्यांनी ठेवायला हवी. निवृत्ती वेतनाचे त्याचे काम एकापेक्षा अधिक वेळा हेलपाटे घालायला न लावता व्हायला हवे. सर्वच निवृत्त सरकारी नोकरांच्या बाबतीत हे व्हायला हवे. कारण उतार वयामुळे त्यांच्या पुढे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या असतात, उत्पन्नाचे अन्य साधन नसते, अनेकांना कुणाचा आधार नसतो. नोकरीत असताना जे जोडधंदा करतात, किंवा त्यांच्या कुटुंबात आणखी कुणी नोकरी-व्यवसाय करीत असतात किंवा निवृत्तीनंतर अर्थार्जनाची आधीच सोय ज्यांनी करून ठेवलेली असते त्यांचा प्रश्‍न वेगळा असतो. मात्र निवृत्तिवेतन हाच ज्यांचा जीवन जगण्याचा आधार असतो त्यांच्यापुढे मोठी समस्या निर्माण होते. जे कनिष्ठ पदावरून निवृत्त होतात त्यांच्यापुढे तर मोठेच प्रश्‍नचिन्ह उभे असते. अशा निवृत्त लोकांसाठी संबंधित अधिकार्‍यांनी वारंवार खेटे घालायला लावू नये. एकाच वेळी जे काही निवृत्तीसंबंधी कागदपत्र असतील ते भरून घ्यावेत आणि निवृत्तिवेतन मिळण्याचा मार्ग निर्विघ्न करावा. आपणदेखील कधीतरी निवृत्त होणार आहोत याचीही जाणीव या अधिकार्‍यांनी ठेवायला हवी.
सगळ्यात जास्त हाल त्या परिवाराचे होतात ज्यांचा मिळवता माणूस नोकरीत असताना अचानक मरण पावतो आणि ज्यांच्यापाशी जगण्याचे कोणतेच अन्य साधन उपलब्ध नसते. या संबंधीचा एक अनुभव सांगतो.

२००२-०४ सालच्या दरम्यान मी मध्य शिक्षण विभागात कार्यरत असताना एक पत्र आले. हे पत्र नोकरीत असताना दोन वर्षापूर्वी दिवंगत झालेल्या एका शिक्षकाच्या मुलीचे होते. पत्रातील भाषा पाहिली तर व्याकरणदृष्ट्या सदोष होती. परंतु पत्रातील मजकूर महत्त्वाचा होता. सदरची मुलगी गणित विषयातील पदवीधर होती आणि शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केलेली होती. तिच्या वडिलांचे ते सेवेत असताना निधन झालेले असल्याने सहानुभूती तत्त्वावर तिला त्या संस्थेने नोकरी द्यायला हवी होती पण संस्था टंगळ-मंगळ करीत होती. या संस्थेला तिच्या नेमणुकीसाठी मोठ्या रकमेची अपेक्षा होती जी ती देऊ शकत नव्हती. या मुलीची कैफियत रास्त होती. मी तिला भेटीला बोलावले. सर्व हकीगत समजावून घेतली आणि त्याचबरोबर तिच्या भाषिक ज्ञानातील त्रुटीही दाखवून दिल्या. तिला म्हणालो, नोकरीसाठी अर्ज करताना अशाच चुका राहिल्या तर कोण तुला मुलाखतीला बोलावील? आधी या चुका होणार नाहीत याची काळजी घे आणि ज्यावेळी या विभागाच्या तीन तालुक्यांपैकी (आता चार तालुके झालेत) कुठल्याही शाळेची शिक्षक भरतीची जाहिरात आली तर मला येऊन भेट.

दोनच महिन्यांनी ती मुलगी कार्यालयात भेटायला आली. तिचे वडील ज्या हायस्कूलमध्ये नोकरी करीत होते त्याच ठिकाणी गणित विषयासाठी शिक्षक हवा होता. तिला अर्ज पाठवायला सांगितले आणि धीर दिला की शक्य ती मदत मी करीन, घाबरू नकोस. मुलाखतीच्या दिवशी शिक्षण खात्याचा प्रतिनिधी म्हणून मुलाखत घेण्यासाठी मी संस्थेच्या कार्यालयात दाखल झालो. मुलाखतीत पारदर्शकता यावी म्हणून गुणतक्ता यापूर्वीच शिक्षण खात्याने सर्वांना पाठविला होता पण त्याकडे कोणी विशेष लक्ष देत नसे. जे संस्थेला भरपूर देणगी देत त्यांची निवड वशिलेबाजीने केली जायची. मी या गुणतक्त्यावर भर द्यायचे ठरविले. संस्थेचे चेअरमन, सेक्रेटरी आणि शाळेचे मुख्याध्यापक हे अन्य तिघे मुलाखत घेणार्‍या टीममध्ये होते. एकापाठोपाठ एक उमेदवार येत होते, तशी ही देखील मुलगी आली. तिचा अर्ज मी हाती घेतला. तिची कौटुंबिक पार्श्‍वभूमी विचारली (जी मला पूर्वीच माहीत होती पण इतरांना दाखवून दिले नाही). आपले वडील याच शाळेत शिक्षक होते व नोकरीत असताना त्यांचे दोन वर्षापूर्वी निधन झाल्याचे तिने सांगितले. मी प्रश्‍नार्थक मुद्रेने मुख्याध्यापक आणि चेअरमनकडे पाहिले. त्यांचे चेहरे उतरले. तिची प्रमाणपत्रे नजरेखालून घातली. अनुभव वगळता अन्य सर्व गोष्टी तिच्या नेमणुकीसाठी योग्य होत्या. अन्य उमेदवारांपैकी गणित हा प्रमुख विषय त्यांच्या पदवीचा नव्हता, कुणी पदार्थ विज्ञान तर कुणी रसायन शास्त्राचा विद्यार्थी होता. गुणतक्त्यात यासंबंधी मी नोंद केली आणि सदर मुलगी गणित विषयासाठी योग्य असल्याचा शेरा तर मारलाच परंतु सरकारी नियमानुसार सहानुभूती तत्त्वावर प्राधान्यक्रमाने तिची नेमणूक झाली पाहिजे असे मुख्याध्यापक व चेअरमन यांच्या निदर्शनास आणले.

पुढे त्या मुलीची नेमणूक झाली. त्यानंतर काही महिन्यांनी मी त्या शाळेच्या वार्षिक तपासणीसाठी गेलो असता ती मुलगी भेटली. तिची चौकशी केली. संस्थेकडून काही त्रास होतो का विचारले, ती आधी चाचरत नाही म्हणाली. आपणाला तुमच्यामुळे नोकरी मिळाली हेच मोठे उपकार झाले. मी तिला पुन्हा स्पष्टच विचारले की तुला नोकरीसाठी पैसे वगैरे द्यावे लागले का? तेव्हा ती म्हणाली, ‘‘होय पण त्यांनी हप्त्याने दिले तरी चालतील असे सांगितले आहे. कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान इथे पगारातून मी हप्ते भरू शकेन. इतर ठिकाणी रोख द्यावे लागले असते जे आमच्याकडे नाहीत आणि एक दोन वर्षात सर्व सुरळीत होईल. कृपया तुम्ही संस्थेवर काही कारवाई करू नका. माझी आहे ती नोकरी जाईल कारण मला नियमित करणे संस्थेच्या हाती आहे’’. तिचे म्हणणे काळानुरूप रास्त होते. मनाला या गोष्टी न पटणार्‍या होत्या परंतु वस्तुस्थिती खरी होती. बरे, त्या मुलीने संस्थेला देणगी दिली याचा कोणताही सबळ पुरावा मागे ठेवला जात नव्हता. समाधान एकाच गोष्टीचे होते की एका गरजवंत आणि सेवेत असताना निधन पावलेल्या शिक्षकाच्या मुलीला नोकरी मिळाली होती. राहून राहून मात्र असेच वाटत राहिले की ‘असे व्हायला नको होते. संस्थेने प्राधान्याने तिला यापूर्वीच नोकरी द्यायला हवी होती. दोन वर्षे तंगवत ठेवायची काहीही गरज नव्हती.’

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

इकडेही लक्ष द्या

कोरोनाचा वणवा राज्यात चहुदिशांनी भडकल्यावर आणि सर्वतोपरी सज्जतेचे दावे उच्च न्यायालयात उघडे पडल्यावर आता राज्य सरकार उपाययोजनांच्या विहिरी खोदायला निघाले आहे. गोवा...

कोरोना बळींची संख्या २ हजारांजवळ

>> राज्यात शुक्रवारी ६१ मृत्यू, २४५५ बाधित, एकूण बळी १९९८ राज्यात गेल्या चोवीस तासांत पुन्हा एकदा उच्चांकी ६१ रुग्णांचा...

प्राणवायूसंदर्भातील उपाययोजनांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर

राज्य सरकारचे आरोग्य सचिव रवी धवन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला गोमेकॉमधील प्राणवायू पुरवठा व इतर समस्या सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा...

गोमेकॉत प्राणवायू टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू ः मुख्यमंत्री

बांबोळी येथील गोमेकॉतील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी नवीन २० हजार लीटर क्षमतेची प्राणवायू टाकी बसविण्याचे काम जोरात सुरू आहे, अशी माहिती...

कोरोनाविरोधातील युद्ध जिंकणारच ः मोदी

>>किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकर्‍यांना आठवा हप्ता भारताचे अद्यापही कोरोनाशी सुरू असलेले युद्ध आपण लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्‍वास पंतप्रधान...

ALSO IN THIS SECTION

एकत्र कुटुंब ः संस्कारांंची पाठशाळा

सौ. माधुरी रं. शे. उसगावकर कुटुंब म्हणजे आपुलकी, ममत्व. एकमेकांचा हात पकडून समतोल साधून पुढे जाणे. सुखासाठी जे...

या जन्मावर या जगण्यावर …

दीपा मिरींगकर रोजच्या जगण्यात समस्या असणारच. पण कधीतरी थोड्या उंचावरून पहिले की सगळे लहान होत जाईल. एक पिंपळपान...

रवीन्द्रनाथ टागोर ः नोबेल विजेते पहिले आशियाई महाकवी

शंभू भाऊ बांदेकर, साळगाव आपल्या साहित्याने, कार्याने व अजोड कर्तृत्वाने भारत देशाला यशोशिखरावर नेणार्‍या, नोबोल पुरस्कारविजेत्या गुरुदेव रवीन्द्रनाथ...

आयुर्वेदातला एक झंझावात हरपला….!!!!

वैद्य विनोद वसंत गिरी वैद्य अनिल विनायक पानसे. एक आयुर्वेद वैद्य. सर गोमन्तक आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र,...

दीप अखेरचा निमाला…

ज. अ. रेडकर.(पेडणे) हा प्रभू येशूचा पुत्र होता. काही काळासाठी तो या भूतलावर आला होता. आपले कार्य संपन्न...