Home बातम्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; दोघांना अटक

अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; दोघांना अटक

0

दि. २६ सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर एका तरुणाने तिला नावेली येथून पणजी येथे नेले व पर्वरी परिसरात नेऊन बलात्कार केला व आपल्या घरी ठेवले. त्यानंतर पणजी येथील दुसर्‍या तरुणाने मिरामार येथे नेऊन बलात्कार केला व ६ ऑक्टोबरपर्यंत आपल्या घरात ठेवून त्या दिवशी तिला पणजीहून बसने मडगाव कदंब बस स्थानकावर सोडून आपल्या घरी जाण्यास सांगून तो फरारी झाला.

कदंबा बसस्थानकावर मिनी बसचा कंडक्टर वासिम दादापीर कालीगर भेटला. तो रुमडामळ दवर्ली येथील असून त्याने मुलीला दवर्ली मशिदीच्या मार्गावरील सुरभी आयस्क्रीम पार्लरमध्ये नेऊन बलात्कार केला. त्यानंतर ती पणजीला गेली. पणजीहून तिच्या नातेवाईकांनी आपल्या गाडीने मडगाव येथे आणून घरी पोहचविले.

पोलिसांनी त्या तिघांची वैद्यकीय चाचणी केली आहे. बायलांचो एकवटच्या आवदा व्हिएगश यांनी तिची जबानी घेतली.

इतरांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक सुदेश नाईक तपास करीत आहेत.