दक्षिण गोव्यातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून तिला मारहाण केल्याची तक्रार सदर मुलीने बुधवारी पर्वरी पोलीस स्थानकात नोंद केली असून संशयित जाफर शेख (२७) व सल्लू पठाण (२१) या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदर मुलीस रामनगर (बेती) येथील जाफर आणि सल्लू यांनी पळवून आणून तिला पर्वरीतील एका बांधकाम ठिकाणी आणले. काही वेळाने काही कारणावरून त्यांच्यात वाचाबाची झाल्याने त्या युवकांनी तिला मारहाण केली. सदर प्रकार बुधवारी रात्री घडला. त्याचवेळी तेथून जाणार्या पादचार्याने पर्वरी पोलिसांना
कळविले. उपनिरीक्षक विलेश दुर्भाटकर यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी करून तिला पर्वरी पोलिस स्थानकात आणले असता तिने जाफर आणि सल्लू यांच्याबद्दल तक्रार केली आहे. दरम्यान दोघा युवकांनी घटनास्थळावरून दुचाकीवरून पळ काढला होता. गुरुवारी सकाळी पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात घेतले.

