गेल्या शुक्रवारी सडा येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी मंगळवारी मुरगाव पोलिसांनी अटक केलेल्या दीपक कुमार सिंह (२२ वर्षे) याला काल दुपारी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात उभे करून अधिक चौकशीसाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करून घेण्यात आली आहे.
संशयित दीपक कुमार बिंद याने गेल्या आठवड्यात सडा येथील एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी मुरगाव पोलीस स्थानकात नोंदविली होती. या तक्रारीची दखल घेऊन मुरगाव पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध घेतला असता तो मंगळवारी पणजी येथे पोलिसांना सापडला. मुरगाव पोलिसांनी त्याच्यावर आता बलात्कार केल्याचाही आरोप नोंद केलेला आहे. पणजी येथील बाल न्यायालयात हजर करून पुढील चौकशीसाठी रिमांड मागून घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी सांगितले.