Home बातम्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचारप्रकरणी एकास अटक

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचारप्रकरणी एकास अटक

0

चिखली येथील एका अल्पवयीन मुलावर स्वतःच्या गाडीमध्ये बसवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी वाडे येथील चॉल्टन बार्नेटो याला वास्को पोलिसांनी अटक केली.

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्रौ ८.३० च्या सुमारास घडली. चिखली येथील गोवा शिपयार्ड अतिथी गृहाजवळ राहणारा १५ वर्षीय मुलगा चर्चिल ब्रदर्स आणि मोहन बगान यांच्यातील फुटबॉल सामना संपल्यानंतर आपल्या घरी जाण्यासाठी येथील सेंट ऍन्ड्र्यू चर्चजवळ बसच्या प्रतीक्षेत थांबला होता. यावेळी त्याचमार्गाने आपल्या कारने (क्र. जीए ०८ एफ ८००३) जाणार्‍या चॉल्टन बार्नेटो याने त्या मुलाला लिफ्ट दिली.

गाडीमध्ये बार्नेटो याने त्या मुलाला मारहाण केली तसेच नंतर लैंगिक अत्याचार करून चिखली येथे सोडून दिले. सदर मुलाच्या वडिलांनी सकाळी वास्को पोलीस स्थानकामध्ये तक्रार केल्यानंतर उपनिरीक्षक निखील पालेकर यांनी चॉल्टन बार्नेटो याला भा.दं.सं. कलम ३४२ व गोवा बालक कायदा ८ (२) व बाल संरक्षण लैंगिक संरक्षण कायदा ७ अंतर्गत गुन्हा नोंद करून बार्नेटो याला अटक केली.