अरविंद केजरीवालांच्या ‘त्या’ वक्तव्यानेविरोधकांच्या आघाडीबाबत संभ्रम वाढला

0
12

आगामी गोवा विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी भाजप आणि काँग्रेस पक्षाला मतदान करू नये, असे आवाहन आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना दोनापावल येथे काल केले. काँग्रेसचे निवडून आलेले आमदार कालांतराने भाजपमध्येच सामील होतील, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

आम आदमी पक्षाने आघाडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एका समितीची निवड केलेली आहे. त्यांनी कॉँग्रेससोबत संभाव्य चर्चेला सुरुवात केली आहे. तथापि, अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आगामी निवडणुकीत भाजपविरोधी मतांची विभागणी टाळण्यासाठी विरोधकांमध्ये आघाडी होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपमध्येच गोंधळ : चोडणकर
आपची केंद्रीय समिती आणि स्थानिक समितीत आघाडीबाबत गोंधळाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल व्यक्त केली.