अरबी समुद्रात उभारणार शिवाजी महाराजांचे स्मारक

0
94

अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित सुरक्षा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या स्मारकाला रडार विरोधी यंत्रणा, खंदक व स्वतंत्र सुरक्षा विभाग असे खास सुरक्षा कवच देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न चालवले आहेत. तसेच या ठिकाणी एनएसजीचे कमांडोही तैनात केले जाणार आहेत. राज्य सरकारने नरीमन पॉईंट येथून सुमारे अडीच कि. मी. अंतरावर अरबी समुद्रात हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. २०१९ मध्ये हे स्मारक पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.