रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटस् पक्षातील विसंवादातून विनियोग विधेयकांची वाट मोकळी होऊ न शकल्याने अमेरिकेत सरकारला आपली अनेक कार्यालये बंद ठेवणे भाग पडले आहे. देशभरातील जवळजवळ आठ लाख कर्मचार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या नागरिकांसाठी लागू केलेल्या ‘ओबामाकेअर’ या आरोग्य विमा योजनेस सरकारी निधी पुरवण्यास रिपब्लिकन पक्षाचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी सरकारला विनियोग विधेयके संमत करण्यास सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे आर्थिक वर्ष एक ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर हे असते. नवे आर्थिक वर्ष सुरू झाले तरी विनियोग विधेयके सरकारला संमत करून घेता न आल्याने सरकारला आपली अनेक खाती तात्पुरती बंद करण्यावाचून पर्याय राहिला नाही. अमेरिकी सिनेट आणि प्रतिनिधीगृह यामध्ये अनुक्रमे डेमोक्रॅटस् आणि रिपब्लिकन यांचे बहुमत आहे.