रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका सातत्याने दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. अमेरिकेकडून भारतासह आणखी पाच देशांची कोंडी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका आता 100 टक्के आयातशुल्क लादण्याच्या हालचाली करत आहे. या पार्श्वभूमीवरच रशियावरील निर्बंधांच्या विधेयकाला अमेरिकन सिनेटने मंजुरी दिली आहे. यामध्ये भारत, चीनसह पाच देशांवर 100 टक्के आयातशुल्क लादण्याचा प्रस्ताव आहे.

