अमित शहांनी राजिनामा द्यावा

0
172

>> सोनिया ः हिंसाचारास जबाबदार असल्याचा आरोप

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल पत्रकार परिषदेत दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप केला. दिल्लीतील सध्याच्या स्थितीला केंद्र सरकारबरोबरच अमित शहा जबाबदार आहेत असे गांधी म्हणाल्या. तसेच याप्रकरणी जबाबदारी स्वीकारून अमित शहा यांनी त्वरित पदाचा राजिनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकार व दिल्ली सरकार यांचे हे सामूहिक अपयश असल्याचा दावा त्यांनी केला.

या हिंसाचारामागे एक कारस्थान आहे. दिल्ली विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीवेळीही देशाने त्याची झलक पाहिली आहे. त्यावेळीही भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केली याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याआधी कॉंग्रेस कार्यकारिणीची बैठक श्रीमती गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

कॉंग्रेस कार्यकारिणी बैठकीत दिल्ली हिंसाचाराचा आढावा घेण्यात आला. तसेच या सर्व हिंसाचाराची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारवर असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच दिल्लीत शांतता व सलोखा कायम ठेवण्यासाठी लोकांकडे जाण्याबाबत केजरीवाल सरकार अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला.