अमरनाथ यात्रेकरूंच्यासुरक्षा रक्षकांवर हल्ला

0
10

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील लाल चौक परिसरात अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेत तैनात असलेले जम्मू-काश्मीर पोलीसमधील हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन कुरेशी यांच्यावर दहशतवाद्यांनी काल बुधवारी अचानक गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. यानंतर, तब्बल 1000 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून संपूर्ण काश्मीर घाटीत सुरक्षा दलांनी हाय अलर्ट जारी केला आहे. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन हे अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेवर तैनात होते. याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांच्या जवानांनी ताबडतोब संपूर्ण लाल चौक परिसराची नाकाबंदी केली. हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.