शिरोडा येथील रायेश्वर अभियांत्रिका महाविद्यालय वगळता सर्व खाजगी तांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क ५ हजार ते ८ हजार रुपयेपर्यंत वाढविण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून या प्रश्नावर व्हॉयस ऑफ स्टुडंट्स संघटनेचे अध्यक्ष अक्षय नाईक मडकईकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तांत्रिक शिक्षण संचालकांची भेट घेऊन वाढीव शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याची मागणी केली आहे.
कोणत्याही महाविद्यालयातील शुल्क वाढविण्याचा निर्णय शुल्क ठरविण्यासाठी असलेल्या सरकारच्या समितीच्या मान्यतेनुसारच घेतला जातो. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याच्या वेळीच शुल्क वाढविण्याचे सांगितल्याने गोंधळ निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही निवेदन सादर केले आहे.