अभिजात पर्रीकर यांना सुळकर्णा येथे अपघात

0
40

अभिजात पर्रीकर हे काल बुधवारी आपल्या गाडीने (जीए ०३ वाय ७५१७) नेत्रावळी येथील फार्मवरून परत येताना सुळकर्णा येथे रस्त्याच्या बाजूला साचलेल्या चिखलात गाडीचे चाक घसरले. त्यामुळे गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला कलंडली. यात गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी अभिजात पर्रीकर यांना कोणतीच जखम झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. केपे पोलिसांनी याबाबत माहिती दिली. अपघातानंतर अभिजात हे पणजी येथे निवासस्थानी सुखरूप पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली.